IMPIMP

Muralidhar Mohol – MLA Ravindra Dhangekar | पुण्यात मोहोळ विरूद्ध धंगेकर सामना रंगणार?, काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष

by sachinsitapure

पुणे : Muralidhar Mohol – MLA Ravindra Dhangekar | भाजपाने (BJP) महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर पुणे लोकसभेसाठी (Pune Lok Sabha) माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. आता प्रतिक्षा आहे ती काँग्रेसकडून (Congress) कोणत्या उमेदवाराची घोषणा होणार याबाबत. काँग्रेसचे कसब्यातील आमदार रवींद्र धंगेकर यांना लोकसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर धंगेकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली तर पुण्यात मोहोळ विरूद्ध धंगेकर असा रंगतदार सामना होईल.

दरम्यान, महाविकास आघाडीचे जागावाटप (Mahavikas Aghadi Seat Sharing) पूर्ण झाले असून एकत्रितपणे सर्व उमेदवारांची यादी जाहीर करू, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. या यादीत आमदार रवींद्र धंगेकर यांचे नाव आल्यास पुण्यातील लोकसभा निवडणुक अटीतटीची होईल.

कसबा विधानसभा (Kasba Vidhan Sabha) पोटनिवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देणारे रवींद्र धंगेकर यांना लोकसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता काँग्रेस उमेदवारांच्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपाने लोकसभा निवडणुकांसाठी पक्षाची दुसरी आणि महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी बुधवारी सायंकाळी जाहीर केली. त्यामध्ये माजी खासदार आणि दिवंगत नेते गिरीश बापट यांच्या जागेवर पुण्यातून लोकसभेची उमेदवारी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना जाहीर झाली.

मोहोळ हे प्रबळ उमेदवार मानले जात आहेत. भाजपामध्ये ३ ते ४ जण उमेदवारीसाठी इच्छूक होते, त्यापैकी भाजपाचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र, पक्षाने मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. आता पुणे लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम मोहोळ विरूद्ध धंगेकर असा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pune Vishrantwadi Crime | कोयत्याचा धाक दाखवून व्यावसायिकाला लुटले, एकाला अटक; विश्रांतवाडी भागातील घटना

Related Posts