IMPIMP

Pimpri Chinchwad Police MCOCA Action | पिंपरी : भोसरीतील जगताप टोळीवर ‘मोक्का’! आयुक्तांची 8 टोळ्यांमधील 39 जणांवर कारवाई

by sachinsitapure

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन – Pimpri Chinchwad Police MCOCA Action | आगामी लोकसभा निवडणूका (Lok Sabha Election 2024) भयमुक्त आणि नि:पक्षपाती पार पडाव्यात यासाठी पिंपरी- चिंचवड पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील 8 सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांमधील 39 आरोपींवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे (Vinay Kumar Choubey) यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांनी आत्तापर्यंत 396 आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांनी भोसरी पोलीस ठाण्याच्या (Bhosari Police Station) हद्दीतील जगताप टोळीवर (Jagtap Gang) मोक्का कारवाई केली आहे.

टोळी प्रमुख आदर्श ऊर्फ कुक्या गोविंद जगताप (वय 22, रा. आदर्श नगर, मोशी पुणे), सुनिल राणोजी जावळे (वय 26, रा. आदर्श नगर, मोशी पुणे), रोहित ऊर्फ कक्या ज्ञानेश्वर सोनवणे (वय 19, रा. आळंदी रोड, भोसरी, पुणे) अशी कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.

भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपींनी संघटीत गुन्हेगारांची टोळी तयार करुन 13 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. या टोळीने भोसरी, दिघी, वाकड, फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, जबरी चोरी, चोरी, बेकायदेशीर हत्यार बाळगणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत.

भोसरी पोलीस ठाण्यात आयपीसी 307, 323, 504, 506, 34 सह क्रिमीनल लॉ अमेन्डमेंट अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, आर्म अॅक्ट नुसार दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी (Vasant Pardeshi IPS), पोलीस उपायुक्त गुन्हे संदिप डोईफोडे (Sandeep Doiphode), पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 स्वप्ना गोरे (Swapna Gore), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 बाळासाहेब कोपनर (Balasaheb Kopnar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे (Nitin Fatangare), पीसीबी गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अनिल देवडे (Anil Devde), पोलीस उपनिरीक्षक शेख, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी यांच्या पथकाने केली.

Maratha Andolak-Ashok Chavan | संतप्त मराठा बांधवांनी अशोक चव्हाणांची गाडी आडवली, जोरदार घोषणाबाजी, अखेर माघारी फिरले

Related Posts