IMPIMP

Pune ACB Trap | 50 हजार रुपये लाच घेताना हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

by nagesh
Satara ACB Trap | Two people, including a police sub-inspector, are in the net of anti-corruption pune in a bribery case of two lakhs

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनPune ACB Trap | फसवणूक प्रकरणातील 20 लाख रुपये मिळवुन देण्यासाठी 50 हजार रुपये लाच स्विकारताना (Accepting Bribe) हडपसर पोलीस ठाण्यातील (Hadapsar Police Station) पोलीस उपनिरीक्षक सागर दिलीप पोमन PSI Sagar Dilip Poman (वय-33) यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap) रंगेहात पकडले. सागर पोमन यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) करण्यात आली आहे. पुणे एसीबीने ही कारवाई मंगळवारी (दि.19) रात्री 10.40 च्या सुमारास कोरेगाव पार्क (Koregaon Park) येथील मोका हॉटेलमध्ये (Moka Hotel) केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी उत्तर प्रदेशातील गोमतीनगर येथील 32 वर्षीय तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Pune ACB Trap) तक्रार केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सागर पोमन (PSI Sagar Poman) हे हडपसर पोलीस ठाण्यात कार्यरत असून तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. तक्रारदार यांनी फसवणुक (Cheating) झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. तक्रारदार यांचे 20 लाख रुपये परत मिळवून देण्यासाठी पोमन यांनी 50 हजार रुपये लाच मागितली. मात्र, तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.

 

पुणे एसीबीने तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता पोलीस उपनिरीक्षक सागर पोमन यांनी तक्रारदार यांचे फसवणुक झालेले वीस लाख रुपये परत मिळवुन देण्यासाठी 50 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच लाचेची रक्कम कोरेगाव पार्क येथील मोका हॉटेलमध्ये स्विकारण्याचे मान्य केले. पथकाने मंगळवारी हॉटेलमध्ये सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून 2000 रुपयांच्या 25 नोटा लाच स्वरुपात स्विकारताना सागर पोमन यांना रंगेहात पकडले.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी,
असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

 

Web Title :- Pune ACB Trap | pune acb trap on PSI Sagar Poman hadapsar police station pune crime news

 

हे देखील वाचा :

Kirit Somaiya On Shivsena MP Sanjay Raut | किरीट सोमय्यांचं सूचक ‘Tweet’; म्हणाले – ‘अब संजय राऊत की बारी’

ED Summons To Shivsena MP Sanjay Raut | शिवसेना खासदार संजय राऊतांना ‘ईडी’कडून पुन्हा समन्स

Shivsena MP Sanjay Raut | “संसार में सबसे आसान काम अपनेको धोखा देना हैं” – संजय राऊतांचं ट्वीट

 

Related Posts