IMPIMP

Pune Crime | जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तडीपार गुंड, प्रदीप बाजीराव जगताप विरुद्ध कारवाई

by nagesh
Pune Crime | Women's jewelry looted on the pretext of sari distribution; Incident at Lal Mahal Chowk

पुणेसरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला गुंड पुणे जिल्हा नियोजन समितीच्या Pune District Planning Committee (डीपीडीसी) बैठकीत उपस्थित राहिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी ग्रामीण पोलीस (Rural Police) अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (Dr. Abhinav Deshmukh) यांच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी गुंडा (Pune Crime) विरुद्ध कारवाई करुन त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, तडीपार गुंड बैठकीस कसा हजर राहिला, याचा तपास करण्याचे आदेश डॉ. देशमुख यांनी सासवड पोलिसांना दिले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

प्रदीप बाजीराव जगताप Pradeep Bajirao Jagtap (वय ६०, रा. सासवड) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्याचे नाव आहे.

जगताप सराईत गुंड असून त्याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले. दरम्यान, विधान भवनात सोमवारी पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule), श्रीरंग बारणे (Srirang Barne), प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar), राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. जगतापने तडीपारीची कारवाई रद्द करण्यासाठी प्रांतधिकाऱ्यांकडे अपील केले होते. प्रशासनाने त्याचे अपील फेटाळले होते.

 

जगताप पुण्यात असल्याची माहिती सासवड पोलीस ठाण्याचे (Saswad Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक
अण्णासाहेब घोलप (Senior Police Inspector Annasaheb Gholap) यांना मिळाली होती.
दरम्यान, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जगताप उपस्थित असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव
देशमुख यांना मिळाली. बैठक सुरू असताना डॉ. देशमुख यांनी सासवड पोलिसांच्या पथकाला ही माहिती दिली.
बैठकीत उपस्थित असलेल्या जगताप याला ताब्यात घेण्यात आले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | Action against Tadipar gangster, Pradeep Bajirao Jagtap in District Planning Committee meeting

 

हे देखील वाचा :

Pune Crime | खून करुन अपघात झाल्याचा केला बनाव; उत्तमनगर पोलिसांनी केले ७ जणांना अटक

Satara Crime | रक्षकच बनला भक्षक… महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिसावर ‘पॉक्सो’ अंतर्गत FIR

Pune Rain | अग्निशामक दलाने केली 12 जणांची पावसात अडकलेल्या सुटका

 

Related Posts