IMPIMP

Pune Crime | खून करुन अपघात झाल्याचा केला बनाव; उत्तमनगर पोलिसांनी केले ७ जणांना अटक

by nagesh
Pune Crime | Husband killed his wife by stabbing her with a knife due to suspicion of her character, incident in Yerwada

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | एकमेकांच्या ओळखीचे असताना झोपलेल्या तरुणाचा खून (Murder In Pune) करुन त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून अपघाताचा (Accident) बनाव पोलिसांनी उघडकीस आणला आहे. खून करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांना अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अजय ऊर्फ पप्पु राजेंद्र पवार Ajay alias Pappu Rajendra Pawar (वय ३०), बाळासाहेब ऊर्फ बाळु भाऊ गजरे Balasaheb alias Balu Bhau Gajre (वय ४०), निखील ऊर्फ सोन्या एकनाथ चोरे Nikhil alias Sonya Eknath Chore (वय १९), विजय नामदेव गांजरे Vijay Namdev Ganjare (वय ४०), सचिन अदिनाथ कापसे Sachin Adinath Kapse (वय ४१), रोहित ढिले Rohit Dhile (वय २९), गणेश माणिक शिंदे Ganesh Manik Shinde (वय ४७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

 

ओंकार लक्ष्मण सुपेकर Omkar Laxman Supekar (वय २२) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार (Assistant Police Inspector Dadaraje Pawar) यांनी
उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १४१/२२) दिली आहे.
हा प्रकार खडकवासला धरणातील सिंहगड सृष्टीचे मागील बाजूस १० ऑक्टोबरपूर्वी घडला होता. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व ओंकार सुपेकर हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
ओंकार हा आरोपीकडे वाळु काढण्याचे काम करीत होता.
तो झोपला असताना आरोपींनी त्याच्या डोक्यात व तोंडावर मारुन त्याचा खून केला.
त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह खडकवासला गावाच्या हद्दीतील लेक व्ह्यु फॉर्मजवळ रस्त्याच्या कडेला टाकून दिला. जणू अपघात झाल्याचा बनाव केला.
त्याचे आंथरुण, पांघरुण व मोबाईल फेकून देऊन पुरावा नष्ट केला.
शवविच्छेदनात मारहाणीमुळे मृत्यु झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करुन सात
जणांना अटक केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | Faking an accident by murder; Uttamnagar police arrested 7 persons

 

हे देखील वाचा :

Pune Rain | अग्निशामक दलाने केली 12 जणांची पावसात अडकलेल्या सुटका

Satara Crime | रक्षकच बनला भक्षक… महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिसावर ‘पॉक्सो’ अंतर्गत FIR

Ajit Pawar | अजित पवारांनी सरकारला फटकारले, शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात आवाज उठवणार! सभेत सांगितला ‘ईडी’चा अर्थ

Ashish Shelar | ‘मशालीचा चटक बसला’ म्हणणाऱ्या ठाकरे गटाला आशिष शेलारांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘सामनाच्या अग्रलेखात सदैव अजरामर असलेला “गणपत वाणी” आज…’

 

Related Posts