IMPIMP

Pune Crime | भाड्याने फ्लॅट देण्याची जाहिरात वेबसाईटवर करणे पडले महागात; लोहगावमधील तरूणाची 1 लाख 38 हजाराची फसवणूक

by nagesh
Pune Crime | Advertising a flat for rent on a website is expensive; 1 lakh 38 thousand fraud of a young man in Lohgaon

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | फ्लॅट भाड्याने देताना ब्रोकरेज (Brokerage) वाचविण्यासाठी त्याने ऑनलाईन वेबसाईटवर
(Online Websites) जाहिरात (Advertising) अपलोड केली. त्याचा गैरफायदा घेऊन सायबर चोरट्याने (Pune Cyber Crime) अ‍ॅडव्हान्स पैसे
पाठवित असल्याचे भासवून तरुणाला १ लाख ३८ हजार रुपयांना गंडा (Froud Case) घातला. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी लोहगाव येथील एका २९ वर्षाच्या तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३३२/२२)
दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कादीर पत्ता गुलजारपूर (रा. उत्तर प्रदेश – Uttar Pradesh), मल्लिका उज्जल बर्मन Mallika Ujjal Burman (रा.
दुर्गापूर, पश्चिम बंगाल – West Bengal) आणि दोन बँक खातेधारकांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार ५ जानेवारी २०२२ रोजी घडला होता. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांचा फ्लॅट भाडे तत्वावर (Flat Rent Basis) देण्याकरीता हौसिंग कॉम (Housing Com),
नो ब्रोकर कॉम (No broker com) या ऑनलाईन वेबसाईटवर जाहिरात अपलोड केली होती.
ही जाहिरात पाहून आरोपींनी त्यांना व्हाटसअ‍ॅपवर कॉल (WhatsApp Call) केला.
भारतीय सैन्य दलात (Indian Army) काम करीत असल्याची बतावणी केली.
फ्लॅट भाडेतत्वावर घ्यायचे असल्याने सांगून ठरल्याप्रमाणे रक्कम अ‍ॅडव्हान्समध्ये देतो,
असे सांगून फिर्यादी यांना गुगल पे या अ‍ॅपलिकेशनद्वारे पैसे पाठविले असल्याची रिक्वेस्ट पाठविली.
ही रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करण्यास व युपीआय पासवर्ड टाकण्यास भाग पाडले.
त्यांच्या खात्यामधून १ लाख ३८ हजार ९९३ रुपये काढून घेऊन फसवणूक (Cheating Case) केली.
सायबर पोलिसांनी (Cyber Pune Police) प्राथमिक तपास केल्यावर हे सायबर चोरटे उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालमधील असल्याचे आढळून आले आहे.

 

Web Title :- Pune Crime | Advertising a flat for rent on a website is expensive; 1 lakh 38 thousand fraud of a young man in Lohgaon

 

हे देखील वाचा :

Pune Crime | तलाक दिलेल्या पत्नीने पतीवर केला चाकूहल्ला; पिसोळीतील घटना, तलाक दिल्यानंतरही तो ठेवून होता तिच्यावर नजर

Pune Crime | गोळीबार करुन 3.5 कोटी लुणाऱ्या टोळीचा ग्रामीण पोलिसांकडून पर्दाफाश, 1.43 कोटी रुपये जप्त

Pune Rain | पुण्यात पावसामुळे 14 ठिकाणी झाडे कोसळली; गॅस वाहिनी तुटली, 7 ठिकाणी इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटच्या घटना

 

Related Posts