IMPIMP

Pune Crime | गोळीबार करुन 3.5 कोटी लुणाऱ्या टोळीचा ग्रामीण पोलिसांकडून पर्दाफाश, 1.43 कोटी रुपये जप्त

by nagesh
 Pune Crime | pune rural police local crime branch indapur police busted a gang that looted Rs 3.5 crore by shooting, seized Rs 1.43 crore

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune-Solapur Highway) भिगवन जवळ वरकुटे बुद्रुक हद्दीत
शुक्रवारी (दि.26) पहाटे चारचाकी गाडीवर गोळीबार (Firing) करुन तब्बल साडेतीन कोटी रुपयांची रोकड लुटणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण
पोलिसांच्या (Pune Rural Police) स्थानिक गुन्हे शाखा Local Crime Branch (LCB Pune) आणि इंदापूर पोलिसांनी (Indapur Police) बेड्या
ठोकल्या आहेत. या गुन्ह्यातील मुख्य आरोपीसह सहा जणांना पोलिसांनी 72 तासाच्या आत अटक (Arrest) करुन लुटीतील रक्कम (Pune Crime) जप्त केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

टोळीचा प्रमुख सागर शिवाजी होनमाने (वय-34 रा. कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर), बाळु उर्फ ज्योतिराम चंद्रकांत कदम (वय-32 रा. कुर्डुवाडी), रजत अबू मुलाणी (वय-24 रा. न्हावी, ता. इंदापूर), गौतम अजित भोसले (वय-33 रा. वेने ता. माढा), किरण सुभाष घाडगे (वय-26 रा. लोणीदेवकर, ता. इंदापूर), भूषण लक्ष्मीकांत तोंडे (वय-25 रा. लोणीदेवकर) या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत भावेशकुमार अमृत पटेल Bhaveshkumar Amrit Patel (रा. कहोडा, ता. उंझा, जि. मेहेसाना, गुजरात) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात (Indapur Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी मुख्य आरोपी सागर होनामाने, ज्योतीराम कदम आणि रजत मुलाणी या तिघांना कुर्डुवाडी परिसरातून अटक केली. तर गौतम भोसले, किरण घाडगे, भूषण तोंडे या तिघांना राजस्थानमधील (Rajasthan) उदयपुर (Udaipur) परीसरातून ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भावेशकुमार पटेल यांचा कुरियर सर्व्हिसेस (Courier Services) चा व्यवसाय आहे. 26 ऑगस्ट रोजी पटेल हे नांदेड (Nanded), लातूर (Latur) व सोलापूर (Solapur) येथील पार्सल घेऊन सोलापूर पुणे महामार्गावरुन चारचाकीमधून मुंबईला जात होते. इंदापुर टोल नाक्याच्या पुढे वरकुटे पाटी येथे गतिरोधक जवळ गाडीचा वेग कमी केला. पहाटे अडीचच्या सुमारास सहा जणांनी पटेल यांच्या गाडीजवळ येत त्यांना रॉड दाखवत अडवण्याचा प्रयत्न केला.

 

पटेल यांनी त्यांच्या गाडीचा वेग वाढून वेगात पुढे निघून गेले. त्यावेळी आरोपींनी दोन चारचाकी वाहनातून पटेल यांच्या गाडीचा सात ते आठ किमी पाठलाग केला. पटेल यांच्या स्कॉर्पिओ गाडीवर गोळीबार केला. त्या दरम्यान पाठलाग करणाऱ्या दुसऱ्या चारचाकी गाडीने पटेल यांच्या गाडीला आडवी मारुन फिर्यादी यांची गाडी थांबवली. आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या सोबत असलेल्या विजयभाई सोलंकी यांना मारहाण करुन गाडीमधून खाली उतरवत दुसऱ्या गाडीत बसवले. त्यानंतर गाडीत ठेवलेली तीन कोटी 60 लाख 26 हजार रुपयांचा दरोडा टाकून चोरुन नेला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख (SP Abhinav Deshmukh)
यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके (Police Inspector Ashok Shelke)
यांनी तापासाच्या सूचना दिल्या. आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन तपास पथके तयार करण्यात आली.
तसेच इंदापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे (Police Inspector Prabhakar More) यांनी स्वतंत्र तीन तपास पथके तयार केली.
आरोपींचा सहा पथकाकडून तपास सुरु असताना हा गुन्हा सागर होनमाने याने त्याच्या इतर साथिदारांच्या मदतीने केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.
पथकाने कुर्डुवाडी परिसरात आरोपींचा शोध घेऊन सागर होनमाने,
ज्योतीम कदम आणि रजत मुलाणी यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन त्यांच्या इतर साथीदारांची माहिती दिली.

 

पोलिसांनी सागर होनमाने याच्याकडून 72 लाख तर
रजत मुलाणी याच्याकडून 71 लाख 20 हजार रुपये असा एकूण 1 कोटी 43 लाख 20 हजार रुपये जप्त केले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून त्यांच्या इतर साथिदारांची माहिती मिळाली.
त्यानुसार गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशन यांची प्रत्येकी एक असे दोन पथके राजस्थान येथे रवाना करण्यात आली.
पथाकाने गौतम भोसले, किरण घाडगे, भुषण तोंडे या तिघांना
प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या (Pratap Nagar Police Station) हद्दीतून स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते (Addl SP Milind Mohite), उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग गणेश इंगळे (Sub Divisional Police Officer Baramati Division Ganesh Ingle) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस उपनिरीक्षक अमित सिदपाटील (PSI Amit Sidpatil), गणेश जगदाळे (PSI Ganesh Jagdale), सहायक पोलीस उपनिरीक्षक रविराज कोकरे, तुषार पंदारे, बाळासाहेब करांडे, पोलीस हवालदार सचिन घाडगे, अजय घुले, जनार्दन शेळके, राजु मोमीण, विजय कांचन, असिफ शेख, अभिजीत एकशिंगे, स्वप्नील आहीवळे, अक्षय नवले, प्रमोद नवले, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे (Walchandnagar Police Station) पोलीस हवालदार रविंद्र पाटमास, बारामती शहर पोलीस ठाण्यातील (Baramati City Police Station) पोलीस हवालदार कल्याण खांडेकर,

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

इंदापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे,सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार (API Prakash Pawar), महेश माने (API Mahesh Mane), पोलीस उपनिरीक्षक सुधीर पांडुळे (PSI Sudhir Pandule), पोलीस नाईक सलमान खान, विशाल चौधर, पोलीस हवालदार, सुरेद्र वाघ, कल्यान खांडेकर, मनोज गायकवाड, सचिन बोराडे, मोहमंद आली मड्डी, बापू मोहीते, लक्ष्मण सुर्यवंशी, दिनेश चोरमले, विनोद काळे, सुरज गुंजाळ यांनी केली आहे. तसेच प्रतापनगर पोलीस ठाणे राजस्थान येथील पोलीस निरीक्षक दर्शन सिंह राठोड, पोलीस हवालदार बुटी राम, गोविंद सिंग, रुद्रा प्रताप यांनी राजस्थान येथे आरोपी पकडण्यात पुणे पोलिसांना सहकार्य केले.

 

Web Title :- Pune Crime | pune rural police local crime branch indapur police busted a gang that looted Rs 3.5 crore by shooting, seized Rs 1.43 crore

 

हे देखील वाचा :

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे ढोल ताशांच्या गजरात आगमन

e-Search Report Maharashtra | ऑनलाइन मिळकतींचा शोध (ई-सर्च रिपोर्ट) घेण्याची सुविधा पुन्हा सुरू

Narayan Rane | ‘खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच, दसरा मेळावाही त्यांचाच होणार’

 

Related Posts