IMPIMP

Pune Crime | तलाक दिलेल्या पत्नीने पतीवर केला चाकूहल्ला; पिसोळीतील घटना, तलाक दिल्यानंतरही तो ठेवून होता तिच्यावर नजर

by nagesh
Pune Crime | Divorced wife stabs husband; Incident in Pisoli, he was keeping an eye on her even after divorce

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पत्नीला तलाक (Divorce) दिला असतानाही तो तिच्यावर वॉच ठेवून होता. तिला भेटायला एक तरुण येत असल्याचे पाहून त्याचे पित्त खवळत असे. वॉचमनच्या सांगण्यावरुन तो तरुण तिच्या घरी आला असताना तो तिच्या घरी गेला. तेव्हा तिने मी या तरुणाबरोबर लग्न (Marriage) करणार असल्याचे सांगून घरातील चाकूने आपल्या पूर्वश्रमीच्या पतीवर वार करुन जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी एका २८ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८८७/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी एका महिलेवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. ही पिसोळीमधील एका सोसायटीत २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथे राहणार्‍या एका तरुणाने आपल्या पत्नीला एक महिन्यांपूर्वी तलाक दिला आहे.
ही महिला पिसोळी (Pisoli, Pune) येथील एका सोसायटीत राहते.
तलाक दिला असला तरी तो आपल्या पत्नीवर नजर ठेवून होता. तिला भेटायला एक तरुण येत असल्याची माहिती त्याला मिळाली.
तेव्हा त्याने सोसायटीच्या वॉचमनला सांगून ठेवले होते. हा तरुण त्याच्या पत्नीला भेटायला २८ तारखेला सायंकाळी आला होता.
वॉचमनने ही बाब या पूर्वश्रमीच्या पतीला सांगितली. तेव्हा तो तिच्या फ्लॅटवर गेला.
त्या तरुणाला व तिला त्याने विचारणा केली. तेव्हा तिने आपण या तरुणाबरोबर लग्न करणार असल्याचे सांगितले.
त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. तेव्हा तिने घरातील चाकूने आपल्या पूर्वश्रमीच्या पतीच्या मानेवर मारुन त्याला जखमी केले.
पोलीस उपनिरीक्षक बिराजदार (Sub-Inspector of Police Birajdar) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Divorced wife stabs husband; Incident in Pisoli, he was keeping an eye on her even after divorce

 

हे देखील वाचा :

Pune Rain | पुण्यात पावसामुळे 14 ठिकाणी झाडे कोसळली; गॅस वाहिनी तुटली, 7 ठिकाणी इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटच्या घटना

Pune Crime | गोळीबार करुन 3.5 कोटी लुणाऱ्या टोळीचा ग्रामीण पोलिसांकडून पर्दाफाश, 1.43 कोटी रुपये जप्त

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे ढोल ताशांच्या गजरात आगमन

 

Related Posts