IMPIMP

Pune Crime | तरुणावर कोयत्याने वार ! कोंढव्यातील घटना

by nagesh
Pune Crime | incident of attack on a school boy by a goon in kothrud area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | रस्त्यावर भाजीचा स्टॉल लावण्यावरून जागेच्या वादातून दोघा मायलेकाने एका तरुणावर कोयत्याने व चाकूने वार करुन त्याला गंभीर (Attempt To Kill) जखमी केले. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी शिवम दत्तात्रय जगदाळे (वय ३०, रा. साईनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सद्दाम मोईनुद्दीन शेख (वय २४) आणि शायनाबानु मोईनुद्दीन शेख (वय ५०, रा. अप्पर बिबवेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कोंढव्यातील शांतीनगर सोसायटीच्या मेनगेटसमोरील फुटपाथवर रविवारी सकाळी साडे आठ वाजता घडली. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवम जगदाळे व आरोपी यांच्यात फुटपाथवर भाजीचा स्टॉल लावण्याकरीता जागेवरुन वाद झाला. त्यात शायनाबानु हिने फिर्यादीस शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. सद्दाम हा हातात कोयता घेऊन आला. फिर्यादीच्या स्टॉलला लाथ मारुन “इधर तू कैसे धंदा करता मै तेरे को अभी इधरही काट डालता हूॅ” असे म्हणून त्याच्या हातातील कोयत्याने फिर्यादीस मारु लागला. त्यात फिर्यादीच्या डाव्या पायावर, कमरेवर जखमा झाल्या. डोक्यात वार करीत असताना फिर्यादीने हातमध्ये घातला असता हाताच्या बोटावर कोयता लागून तो जखमी झाला. शायनाबानु हिने भाजी कापण्याच्या चाकूने फिर्यादीच्या अंगावर धावून येऊन शिवीगाळ केली. सहायक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Attempt To Kill Incident in Kondhwa

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | ‘…अब बरबाद भी हम करेंगे, भाजपचे साडेतीन लोक कोठडीत जाणार’ – संजय राऊत

EPFO Facility | पीएफ अकाऊंटमधून विम्याचा हप्ता देखील भरता येतो, जाणून घ्या ‘ईपीएफओ’च्या सुविधेबाबत

Nashik Crime | प्रेयसीने पेटवून दिलेल्या तरुणाचा ‘व्हॅलेंटाईन डे’ दिवशीच मृत्यु; प्रचंड खळबळ

Aditya Thackeray | ‘सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस यांना वैफल्य आले’ – आदित्य ठाकरे

 

Related Posts