IMPIMP

Pune Crime | सराईत वाहन चोराला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक; रिक्षा, दुचाकी जप्त

by nagesh
Pune Crime | Bharti Vidyapeeth police arrest criminal of vehicle thief Rickshaw bike seized

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुण शहर आणि परिसरात वाहन चोरी (Vehicle Theft) करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला (Pune
Criminals) भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) अटक (Arrest) केली आहे. त्याच्याकडून रिक्षा आणि दुचाकी जप्त
करण्यात आल्या आहेत. सचिन सुरेश चिंतामणी Sachin Suresh Chintamani (वय – 37 रा. चाळ नंबर 16, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या
सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. ही कारवाई (Pune Crime) बुधवारी (दि.1) कात्रज (Katraj) येथील जैन मंदीर परसरात केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अंमलदार अभिजीत जाधव (Abhijeet Jadhav) व विक्रम सांवत (Vikram Samvat) यांना माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन चिंतामणी हा जैन मंदीर (Jain Temple) परिसरात केटीएम गाडीवरुन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या केटीएम KTM (एमएच 12 क्यूपी 6064) दुचाकीबाबत विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. (Pune Crime)

 

आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने केटीएम दुचाकी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्याच्याकडून आणखी 2 दुचाकी आणि एक रिक्षा जप्त केली. आरोपीने रिक्षा चिंचवड पोलीस ठाण्याच्या (Chinchwad Police Station) हद्दीतून तर युनिकॉर्न (Unicorn) दुचाकी मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या (Market Yard Police Station) हद्दीतून चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपीकडून 1 लाख 85 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik) पोलीस उपायुक्त सागर पाटील (DCP Sagar Patil),
सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan), वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर (Senior Police Inspector Jagannath Kalaskar), पोलीस निरीक्षक गुन्हे संगिता यादव (Police Inspector Sangita Yadav), पोलीस निरीक्षक विजय पुराणिक (Police Inspector Police Vijay Puranik) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे (PSI Nitin Shinde), धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार रविंद्र चिप्पा, गणेश भोसले, अभिजित जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, विक्रम सावंत, सचिन गाडे, आशिष गायकवाड, अवधुत जमदाडे, आकास फासगे, तुळशीराम टेंभुर्णे यांच्या पथकाने केली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Bharti Vidyapeeth police arrest criminal of vehicle thief Rickshaw bike seized

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ; अजित पवारांनी दिला ‘हा’ इशारा

Chandrakant Patil | ‘राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील बडा नेता पराभूत होणार’ – चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

Gopichand Padalkar On Uddhav Thackeray | गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, लिहीलं – ‘अहमदनगरचे नाव बदलून…’

 

Related Posts