IMPIMP

Pune Crime | LSG vs KKR सामन्यापूर्वी मैदानाबाहेर तिकिटांचा काळाबाजार

by nagesh
Pune Crime | Black market of ipl match tickets before LSG vs KKR match in pune

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुण्यातील गहुंजे स्टेडियमध्ये (Gahunje Stadium Pune) शनिवारी (दि.7) कोलकाता नाईट
राइडर्स (Kolkata Knight Riders (KKR) विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants (LSG) या दोन संघामध्ये आयपीएलचा सामना
झाला. या सामन्यापूर्वी (IPL Match) गहुंजे स्टेडियम बाहेर तिकीटांचा काळाबाजार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी (Talegaon Dabhade Police) बेकायदेशीरपणे तिकीट विक्री केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करुन एकाला अटक (Arrest) केली आहे. बाबासाहेब रामदास आमले (Babasaheb Ramdas Amle) आणि शुभम (Shubham) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी बाबासाहेब आमले याला अटक (Pune Crime) केली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत श्रेयस हनुमंत येलवार Shreyas Hanumant Yelwar (वय-21 रा. राजगड पार्क, मोरे वस्ती, चिखली) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.7) रात्री 9 च्या सुमारास गहुंजे स्टेडियमच्या आतमधील वेस्ट स्टॅन्ड जवळ घडला आहे. पोलिसांनी बाबासाहेब आमले (वय-26 रा. कुसगाव ता. मावळ, जि. पुणे) आणि शुभम (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्याविरुद्ध आयपीसी 420, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.(Pune Crime)

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पुण्यातील गहुंजे स्टेडीयम येथे कोलकता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंटस या दोन संघात आयपीएलचा (IPL) सामना झाला. फिर्यादी हे त्यांचे मित्र सुनिल गायकवाड, हर्षल विश्वे, आर्यन गाडकवाड याच्या समवेत गहुंजे स्टेडिअम येथे सामना पाहण्यासाठी गेले होते. स्टेडिअमच्या गेटच्या आत मध्ये वेस्ट स्टॅन्ड जवळील गेट नं. 3 येथे आरोपी बाबासाहेब आमले आणि शुभम उभे होते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आरोपी त्यांच्याकडे असलेले सामन्याचे तिकीट चढ्या दराने विक्री करत होते.
आरोपींनी तिकिटाच्या मुळ किंमतीपेक्षा जास्त रक्कम घेऊन फिर्यादी यांना तिकीट विक्री करुन त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इंगळे (PSI Ingle) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Black market of ipl match tickets before LSG vs KKR match in pune

 

हे देखील वाचा :

Mumbai-Pune Expressway Accident | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकर उलटून भीषण अपघात; 3 ठार

Pune Crime | आजाराला कंटाळून एकाची आत्महत्या, मृतदेह झाडाला कुजलेल्या अवस्थेत आढळला; पुण्यातील धक्कादायक घटना

Liver Failure Warning Signs | ‘हे’ 5 संकेत दर्शवितात की तुमचं यकृत व्यवस्थितरित्या काम नाही करत, अजिबात दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या

 

Related Posts