IMPIMP

Pune Crime Branch Police | नागरिकांचे मोबाईल हिसकावणारी दुकली गुन्हे शाखेकडून गजाआड, एक लाखाचा मुद्देमाल जप्त

by nagesh
Pune Crime | Pune Police Crime branch arrests two drug peddlers in Kondhwa seizes Mephedrone worth 7.5 lakhs

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime Branch Police | पुणे शहरामध्ये रस्त्याने पायी जाणाऱ्या नागरिकांचे मोबाईल हिसकावून जबरी चोरी (Mobile theft) करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. शहरामध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या दोन जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचने (Pune Crime Branch Police) अटक (Arrest) केली आहे. त्यांच्याकडून 1 लाख 15 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

रमेश नागेश माने (वय-19 रा. विद्याविहार कॉलनी, डी. पी. रोड, माळवाडी, हडपसर मुळ रा. आळंब, कर्नाटक), विनोदकुमार केसकुमार वर्मा (वय-21
रा. कौसरबाग, कोंढवा, मुळ रा. धनुबा, जि. चित्रपुर, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून दुचाकी व 8
मोबाईल असा एकूण 1 लाख 15 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गुरुवारी (दि.2) हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पथकातील पोलीस अमंलदार विनोद शिवले (Vinod Shivale) व अकबर शेख (Akbar Sheikh) यांना दुचाकीवर मोबाईल चोरी करुन त्याची विक्री करण्यासाठी एकजण ए.एम. कॉलेज जवळ (A.M. College), महादेवनगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून रमेश माने याला अटक केली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

तर शुक्रवारी (दि.3) पोलीस अंमलदार आश्रुबा मोराळे (Ashruba Morale) व चेतन चव्हाण (Chetan Chavan) यांना कोंढवा येथील एका कॅफेमधील काऊन्टवरुन मोबाईलची चोरी करुन चोरीचा मोबाईल खडी मशिन चौकात विक्रिसाठी येणार असल्याची माहिती मिळाला. त्यानुसार पोलिसांनी विनोदकुमार वर्मा याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी हडपसर (Hadapsar Police Station), वानवडी (Wanwadi Police Station), कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीत मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली आहे.

 

ही कारवाई पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे (अतिरिक्त कार्यभार) भाग्यश्री नवटके (Addl CP Bhagyashree Navatke),
पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Police Inspector Hemant Patil),
पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे (PSI Somnath Shendge), पोलीस अंमलदार रमेश साबळे,
दया शेगर, आश्रुबा मोराळे, चेतन चव्हाण, विनोद शिवले, अकबर शेख, महेश वाघमारे, प्रमोद टिळेकर,
प्रविण काळभोर, पृथ्वीराज पांडोळे, अजय गायकवाड, संजयकुमार दळवी, दिपक लांडगे, दाऊद सय्यद,
विशाल भिलारे, अमर उगले, स्नेहल जाधव, स्वाती गावडे यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Crime Branch Police | pune crime branch police One lakh mobile’s seized from two criminals

 

हे देखील वाचा :

Modi Government | 1 ऑक्टोबरपासून कार्यालयाची वेळ होईल 12 तासांची, ‘OT’ चे मिळणार पैसे आणि वाढणार PF, जाणून घ्या नवीन बदल

Alert ! 30 सप्टेंबर नंतर तुम्ही करू शकणार नाही कोणतेही ट्रांजक्शन, अडकतील सर्व पैसे, जाणून घ्या काय आहे कारण?

Modi Government | मोदी सरकारने केला औषधांच्या दरांमध्ये बदल ! ‘ही’ 39 औषधे होणार स्वस्त, तर 16 महागणार; तपासून घ्या यादी

 

Related Posts