IMPIMP

Pune Crime | महिलेस कंडोमचे पाकीट दाखवून तुम्ही आम्हाला खुश करण्यासाठी असता म्हणणार्‍या व्यावसायिक पिता-पुत्रावर गुन्हा

by nagesh
Pune Crime News | Sahakarnagar Police Station - Rape On Minor Girl in Annabhau Sathe Colony, Aranyeshwar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | महिलेस कंडोमचे (Condoms) पाकीट दाखवून त्यांच्याशी लज्जास्पद वर्तन करुन तुम्ही आम्हाला खुश करण्यासाठीच असता, असे म्हणणार्‍या व्यावसायिक पितापुत्रावर लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी एका ३४ वर्षाच्या महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५००/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दिलीप रिकबचंद ओसवाल Dilip Rickbachand Oswal (वय ५९) आणि त्याचा मुलगा आकाश दिलीप ओसवाल Akash Dilip Oswal (वय २९, दोघे रा. ग़ॉडस गिफ्ट सोसायटी, मंगलदास रोड, बंडगार्डन) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार महावीर रियल्टी (Mahaveer Realty) या कंपनीमधील वाघोली येथील सिल्वर क्रीस्ट (Silver Crest) या प्रोजेक्ट येथे तसेच बंडगार्डन येथील कार्यालयात ५ एप्रिल ते २० जुलै २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप ओसवालने त्यांच्या अंगाला स्पर्श करुन त्यांची मांडी दाबून
ऑफिसजवळ पडलेले कंडोम दाखवून फिर्यादी यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.
त्यांचा मुलगा आकाश याने त्यांच्या शरीराला व इतरत्र हात लावून कंडोमचे पाकीट दाखवून फिर्यादी यांच्या जातीचा
उल्लेख करुन तुम्ही आम्हाला खुश करण्यासाठीच असता असे बोलून अश्लिल शिवीगाळ केली होती.
पोलीस उपनिरीक्षक भदे (Sub-Inspector of Police Bhade) तपास करीत आहेत.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | Case filed against dilip oswal and akash oswal who said ‘You’re here to please us’ by showing condom packet to female

 

हे देखील वाचा :

Nashik ACB Trap | 35 हजार रुपये लाच मागणारे दोन पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Aditya Thackeray | वेदांतानंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला, आदित्य ठाकरेंचा नवा आरोप (व्हिडिओ)

Pune News | पुणे जिल्ह्यातील 61 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू; 5 ग्रामपंचायती बिनविरोध

 

Related Posts