IMPIMP

Nashik ACB Trap | 35 हजार रुपये लाच मागणारे दोन पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

नाशिक :  सरकारसत्ता ऑनलाइन Nashik ACB Trap | पोलिसांनी जप्त केलेला ट्रॅक्टर परत देण्यासाठी 35 हजार रुपये लाचेची मागणी (Demanding Bribe) करणाऱ्या नांदगाव पोलीस ठाण्यातील (Nandgaon Police Station) दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Nashik ACB Trap) भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार सुरेश पंडीत सांगळे (Police Constable Suresh Pandit Sangle), पोलीस शिपाई अभिजीत कचरू उगलमुघले (Abhijeet Kachru Ugalmughle) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. नाशिक एसीबीने मंगळवारी (दि.13) गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत तक्रारदार यांनी नाशिक एसीबीकडे (Nashik ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार यांचा ट्रॅक्टर (एमएच 34 एल 0670) जप्त करुन नांदगाव पोलीस ठाण्यात ठेवण्यात आला होता. जप्त केलेला ट्रॅक्टर परत करण्यासाठी पोलीस हवालदार सुरेश सांगळे यांनी तक्रारदार यांच्याकडे 35 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Nashik) तक्रार केली.

 

तक्रारदार यांच्या तक्रारीवरुन नाशिक एसीबी च्या पथकाने पडताळणी केली.
त्यावेळी तक्रारदार यांचा ट्रॅक्टर परत देण्यासाठी सुरेश सांगळे याने पंचासमक्ष 35 हजार रुपये लाचेची मगाणी करुन रक्कम स्विकारण्याचे मान्य केले.
तर पोलीस शिपाई अभिजीत उगलमुघले याने तक्रारदार यांना लाच देण्यास प्रोत्साहन दिल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.
दोघांविरुद्ध नांदगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.13) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

Web Title :- Nashik ACB Trap | Two policemen who demanded a bribe of 35 thousand rupees in the net of anti-corruption

 

हे देखील वाचा :

Aditya Thackeray | वेदांतानंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला, आदित्य ठाकरेंचा नवा आरोप (व्हिडिओ)

Pune News | पुणे जिल्ह्यातील 61 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू; 5 ग्रामपंचायती बिनविरोध

Pune Rains | अतिवृष्टीमुळे पुण्यातील साडेपाच हजार हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान; एकाचा मृत्यू, 20 हजार कोंबड्या मृत तर 83 घरे जमीनदोस्त

 

Related Posts