IMPIMP

Pune News | पुणे जिल्ह्यातील 61 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू; 5 ग्रामपंचायती बिनविरोध

by nagesh
 Pune News | Election process of 61 gram panchayats of Pune district started; 5 Gram Panchayats unopposed

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू असून त्यातील पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. एक ग्रामपंचायतीसाठी एकही अर्ज आलेला नाही. उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये (Pune District Gram Panchayat) सरपंच पदांच्या ५५ जागांसाठी २१० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सरपंच आणि सदस्य पदासाठी १८ सप्टेंबर रोजी मतदान होणार असून १९ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. (Pune News)

 

जिल्ह्यातील खेड चार, भोर दोन, जुन्नर ३३ आणि आंबेगाव १६ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतीमधील सदस्यांच्या ४८५ जागांसाठी निवडणूक होत असून त्यातील २४० जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आता २४५ सदस्यांसाठी मतदान होणार आहे. विशेष म्हणजे सदस्यांच्या १६ जागांसाठी एकही अर्ज आलेला नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत शाखेकडून सांगण्यात आले. (Pune News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ग्रामपंचायत सरपंचपदाची निवड थेट मतदारांतून होणार आहे. जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचयातींच्या सरपंच पदांसाठी ३१५ जणांनी अर्ज केला होता.
त्यातील १०३ जणांनी माघार घेतली, तर दोघांचा अर्ज बाद झाला होता. पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
त्यामध्ये खेड आणि आंबेगाव तालुक्यातील प्रत्येकी एक, तर जुन्नर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींचा समावेश आहे,
असेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 

Web Title :- Pune News | Election process of 61 gram panchayats of Pune district started; 5 Gram Panchayats unopposed

 

हे देखील वाचा :

Pune Rains | अतिवृष्टीमुळे पुण्यातील साडेपाच हजार हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान; एकाचा मृत्यू, 20 हजार कोंबड्या मृत तर 83 घरे जमीनदोस्त

Vedanta Foxconn Project | महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्यासाठीच वेदांता गुजरातला हलविला – खा. सुप्रिया सुळे

Irrigation Department | राज्यातील धरणांच्या जलाशयांच्या परिसरात 200 मीटर अंतरात पक्क्या बांधकामांना बंदी – पाटबंधारे विभाग

 

Related Posts