IMPIMP

Aditya Thackeray | वेदांतानंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला, आदित्य ठाकरेंचा नवा आरोप (व्हिडिओ)

by nagesh
 Aditya Thackeray | aaditya thackeray after vedanta another project has gone aditya thackeray says govts industry

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या (Vedanta-Foxconn Semiconductor Project) मुद्यावरुन राजकारण तापले आहे. त्यात आता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे सरकारवर (Shinde Government) नवा आरोप केला आहे. आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर नवा आरोप केला आहे. रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्पही (Bulk Drug Park Project Raigad) महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे. दावोसमधून तीन दिवसांत 80 हजार कोटी आणल्याचंही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, बल्क ड्रगमध्ये सरकार पावणेतीन कोटी रुपयांची गुंतवणूक (Investment) करणार होती. नव्या घटनाबाह्य बेकायदेशीर सरकारने 40 आमदारही तिकडं नेले आणि दोन मोठे प्रकल्पही तिकडे नेले. केंद्राबरोबर नीट सांगड घातल्यास सर्व शक्य आहे. पण यांचे कारभारात लक्ष नाही. बल्क ड्रगमुळे 80 हजार रोजगार निघून गेले. अजून तरुण शांत आहेत पण त्यांचा अंत पाहू नका. बल्क ड्रग पार्कही आपल्याकडून कसा काय गेला? एकही गुंतवणूक केंद्राच्या परवानगीशिवाय येऊ शकत नाही. मग केंद्राला पाठपुरावा करुन आम्ही आणले मग यांना का जमत नाही? असा सवाल त्यांनी केला.

 

 

बल्क ड्रग पार्कसाठी केंद्राला आम्ही पत्र देऊन मागणी केली होती. पण तोही गुजरातमधील भरुचकडे जात आहे. गणेश दर्शन घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हे माहिती आहे का? उद्योगमंत्री म्हणतील की, हे आरोग्य विभागाचा आहे. आरोग्यमंत्री म्हणतील हाफकिनच्या माणसाला विचार, असे देखील आदित्य ठकरे म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

फॉक्सकॉनबाबत व्हॉट्सअॅपवर खोटे मेसेज फिरवण्याचे काम सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांनी अद्याप सविस्तर उत्तर दिलं नाही. सरकारने खुलासाही केला नाही.
प्रकल्प महाराष्ट्राबाहेर का गेला? याचं उत्तर मिळाल नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
तसेच 40 गद्दारांनी सरकार पाडलं म्हणून प्रकल्प मागे राहिला. हे घडलं तेव्हा मुख्यमंत्री गणेश दर्शनात व्यस्त होते.
त्यामुळे आता तरुणांच्या बेरोजगारीची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

 

Web Title :- Aditya Thackeray | aaditya thackeray after vedanta another project has gone aditya thackeray says govts industry

 

हे देखील वाचा :

Pune News | पुणे जिल्ह्यातील 61 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू; 5 ग्रामपंचायती बिनविरोध

Pune Rains | अतिवृष्टीमुळे पुण्यातील साडेपाच हजार हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान; एकाचा मृत्यू, 20 हजार कोंबड्या मृत तर 83 घरे जमीनदोस्त

Vedanta Foxconn Project | महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्यासाठीच वेदांता गुजरातला हलविला – खा. सुप्रिया सुळे

 

Related Posts