IMPIMP

Pune Crime | बनावट तारण कर्ज घेऊन साऊथ इंडियन बँकेला 65 लाखांचा ‘चुना’; एका फसवणूकीतून तीन फसवणुकीची प्रकरणे आली समोर

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Cyber Police Station - Woman cheated in the name of selling furniture in the name of Facebook friend

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | मालमत्ता तारण कर्ज (Property Mortgage Loan) घेताना मध्यस्थामार्फत केलेल्या कर्जप्रकरणात
बनावट कागदपत्रे (Fake Documents) आढळून आल्यानंतर त्या मध्यस्थामार्फत केलेल्या कर्ज प्रकरणाची तपासणी साऊथ इंडियन बँकेने (South
Indian Bank) केली. तेव्हा एक नाही दोन नाही तर तब्बल ३ प्रकरणात बनावट कागदपत्रे (Fraud Case) दाखल करुन बँकेची फसवणूक (Cheating
Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी साऊथ इंडियन बँकेच्या वाकड शाखा (South Indian Bank Wakad Branch) अधिकारी सौम्या नायर (Soumya Nair) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५६९/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी स्वप्नील मधुकर भुमकर Swapnil Madhukar Bhumkar (रा. भुमकर वस्ती, हिंजवडी) आणि प्रविण शिंदे Pravin Shinde (रा. रहाटणी) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील भुमकर यांनी फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांच्या मालकीच्या फ्लॅटवर मिळकत तारण कर्ज ६५ लाख रुपयांची मागणी केली होती. कर्ज सल्लागार प्रविण शिंदे यांच्या मार्फत त्यांनी अर्ज केला होता. त्यासाठी त्यांनी आयकर रिटर्न (Income Tax Return) सादर केले होते. त्यानुसार त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करुन बँकेने त्यांना ६५ लाख रुपयांचे कर्ज दिले होते.

 

बँकेचे शाखा अधिकारी अमिताभ कुमार (Amitabh Kumar) हे बँकेतील दुसरे गृहकर्जदार विष्णु घुगे (Vishnu Ghuge) यांच्या मालमत्तेचा शोध घेत होते.
त्यावेळी त्यांना घुगे यांनी ज्या मिळकतीवर कर्ज घेतले होते. ती मिळकत दुसर्‍याच्या नावावर आढळून आली.
त्याने बँकेत सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आले.
त्यावेळी त्यांनी ही कागदपत्रे कोणामार्फत सादर झाली हे तपासले असता ती कागदपत्रे प्रविण शिंदे याच्यामार्फत सादर करण्यात आल्याचे दिसून आले.
त्यानंतर प्रविण शिंदे यांच्या मार्फत जमा केलेली कर्ज प्रकरणे पडताळून पाहिले असताना त्यामध्ये स्वप्नील भुमकर यांचे आयकर रिटर्न चुकीचे असल्याचे दिसून आले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्याचप्रमाणे त्याचे अ‍ॅक्सीस बँकेचे बचत खाते स्टेटमेंट बनावट (Fake Axis Bank Savings Account Statement) असल्याचे दिसले.
बँकेकडे प्रवीण शिंदे याने कर्ज प्रकरण दाखल केलेला कर्जदार नंदकुमार रामचंद्र निंबाळकर (Nandkumar Ramchandra Nimbalkar) यांचे कर्ज प्रकरणात सुद्धा बनावट कागदपत्रे मिळून आली होती.
स्वप्नील भुमकर याने निंबाळकर यांचे आदित्य अग्रो प्रोसेस्ड फुड इंडस्ट्रीजचे (Aditya Agro Processed Food Industries)
चालू खात्यात २ लाख ४२ हजार ५०० रुपये ट्रान्सफर केलेले दिसून आले.
स्वप्नील भुमकर याचे कागदपत्रे बनावट असल्याचे दिसून आल्याने बँकेने नियमानुसार भुमकर यांची मिळकत एनपीए करुन त्यावर प्रतिकात्मक ताबा घेतला आहे.
वाकड पोलीस ठाण्यात ६५ लाख रुपयांची फसवणूक (Fraud Case) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title :- Pune Crime | Cheating Fruad Case South Indian Bank 65 Lacs Wakad Branch

 

हे देखील वाचा :

Health Tips | आजारांना दूर ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत उपयुक्त 5 पदार्थ; रात्री भिजत घालून खाल्ल्याने होईल फायदा, जाणून घ्या

Mukesh Ambani RIL | 20 रुपयांवरून 2400 च्या पुढे पोहचला मुकेश अंबानी यांच्या कंपनीचा शेअर, 1 लाखाचे झाले 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त

Kajol Devgan Oops Moment | फॅशनच्या नादात काजोल झाली भयंकर Oops Moment ची शिकार, पाहा व्हायरल व्हिडिओ..

 

Related Posts