IMPIMP

Pune Crime | बाल विवाह केल्याप्रकरणी पती आणि मुलीच्या वडिलांवर FIR

by nagesh
Pune Crime | FIR against husband and daughter's father in child marriage case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | कायद्याने बाल विवाह (Child Marriage) करणे आणि लावून देणे हा गुन्हा (Crime) असताना देखील अनेक ठिकाणी बाल विवाह लावले जात आहेत. असाच एक प्रकार पुणे जिल्ह्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलगी गरोदर (Pregnant) राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या पती (Husband) आणि तिच्या वडिलांवर (Father) चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) आयपीसी (IPC) 376, बाल विवाह कायदा (Child Marriage Act) कलम 9,10,11 सह पोक्सो अॅक्ट (Pocso Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी एका महिला पोलीस अंमलदार यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चाकण पोलिसांनी 19 वर्षाच्या पतीवर आणि मुलीच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 27 जूलै 2021 रोजी खेड तालुक्यात (Khed Taluka) घडला असून मंगळवारी (दि.26) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune Crime)

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 17 वर्षाच्या मुलीच्या वडिलांनी तिचा 19 वर्षाच्या तरुणासोबत 27 जुलै 2021 रोजी विवाह लावून दिला. मुलगी अल्पवयीन (Minor) असल्याचे माहित असताना देखील मुलीच्या वडिलांनी तिचा विवाह केला. त्यानंतर पतीने तिच्यासोबत शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित करुन तिला तीन महिन्यांची गरोदर केले. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार (Rape), बाल विवाह कायदा, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड (API Gaikwad) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | FIR against husband and daughter’s father in child marriage case

 

हे देखील वाचा :

Pune Crime | महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग, शिपायाला अटक

ED Action On Tabut Inam Endowment Trust | पुण्यातील ताबुत इनाम एन्डॉमेंट ट्रस्टची साडेआठ कोटींची मालमत्ता ED कडून जप्त

Leaves For Bloating | सकाळी ब्रश करण्यापूर्वी ‘ही’ 5 प्रकारची पाने खा, गॅस-पोट फुगणे आणि पोटात दुखण्यावर रामबाण उपाय; जाणून घ्या

Pune Crime | बॉश कंपनीचे बनावट ऑटो पार्ट विक्री करणार्‍या दुकानदारावर FIR; सहकारनगर परिसरातील 2 दुकानातील 82 हजारांचा माल जप्त

 

Related Posts