IMPIMP

ED Action On Tabut Inam Endowment Trust | पुण्यातील ताबुत इनाम एन्डॉमेंट ट्रस्टची साडेआठ कोटींची मालमत्ता ED कडून जप्त

by nagesh
ED Inquiry | eds watch on leaders involved in scams strict action instructions

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन ED Action On Tabut Inam Endowment Trust | पुण्यातील ताबुत इनाम एन्डॉमेंट ट्रस्टची (Tabut Inam Endowment Trust) साडेआठ कोटीची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) मंगळवारी जप्त करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बनावट कागदपत्रे सादर करणा-या इम्तियाज मोहम्मद (Imtiyaz Mohammad) प्रकरणात ताबुत इनाम एन्डाॅमेंट ट्रस्टच्या (TIET) बंँक खात्यामध्ये जमा झालेली दिड कोटींची रक्कम आणि 7 कोटी सतरा लाख रुपयांचे निवासी अपार्टमेंट अशी एकूण 8 कोटी 67 लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. (ED Action On Tabut Inam Endowment Trust)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ताबुत इनाम एन्डाॅमेंट ट्रस्टची बोगस कागदपत्रे उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केली आहे. त्या माध्यमातून टिआयईटीच्या जमीनीच्या संपादनाविरोधात आठ कोटी 67 कोटी रुपयांच्या मनी लॉंड्रींग प्रकरण (Money Laundering Case) पुढे आले होते. याप्रकरणी पुणे पोलिसांकडून (Pune Police) गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला होता. त्यावरुन मुख्य आरोपी इम्तियाज मोहम्मद (Imtiyaz Mohammad), हुसेन शेख (Hussain Shaikh), चांद रमजान मुलाणी (Chand Ramzan Mulani), सतीश राजगुरु (Satish Rajguru), संतोष कांबळे (Santosh Kamble) आणि अन्य जणांनी संगनमत करुन फसवणुक (Fraud) केली होती. इशराक खान (Ishraque Khan), झरीफ खान (Zarif Khan) यांनी TIET ट्रस्टची बोगस कागदपत्रे तयार केली होती. या बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून टिआयईटीचे विश्‍वस्त असल्याचे दाखवुन संबंधित पदाधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करुन ट्रस्टच्या नावाने बॅंकेत खाते उघडण्यात आले होते.

 

या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून सक्तवसुली संचालनालयाकडे वर्ग झाल्यानंतर तपास करण्यात आला.
त्यानंतर या प्रकरणात ट्रस्टच्या बँक खात्यात जमा असलेली दिड कोटी रुपयांची रक्कम त्याचबरोबर
निवासी सदनिका खरेदी करण्यासाठी तसेच वैयक्तिक लाभासाठी बँक खात्यामध्ये रक्कम वळती करण्यात आली होती.
त्यानुसार आता एकूण 8 कोटी 67 लाख रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.

 

Web Title :- assets tabut inam endowment trust confiscated ed action imtiaz mohammad case

 

हे देखील वाचा :

Leaves For Bloating | सकाळी ब्रश करण्यापूर्वी ‘ही’ 5 प्रकारची पाने खा, गॅस-पोट फुगणे आणि पोटात दुखण्यावर रामबाण उपाय; जाणून घ्या

Pune Crime | बॉश कंपनीचे बनावट ऑटो पार्ट विक्री करणार्‍या दुकानदारावर FIR; सहकारनगर परिसरातील 2 दुकानातील 82 हजारांचा माल जप्त

MP Supriya Sule | एसटी विलिगीकरणाचा मुद्दा तर NCP च्या जाहीरनाम्यात, मग का पूर्ण नाही?; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

 

Related Posts