IMPIMP

Pune Crime | हॉटेलमधील भांडणात मांजरीच्या माजी सरपंचावर गोळीबार ! डोक्यात वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

by nagesh
Pune Crime | firing on former sarpanch incident in manjri area of hadapsar pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | हॉटेलमध्ये एकाच टेबलावर बसलेल्याचे दुसर्‍याशी भांडणे झाले असताना त्याने साथीदारांना बोलावून मांजरीच्या (Manjri) माजी सरपंचावर गोळीबार (Firing On Former Sarpanch Of Manjri Pune) करुन त्यांच्या डोक्यात दगड, विटाने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केला. गोळी चुकविल्याने सरपंच बचावले असले तरी त्यांच्या डोक्यात वार केल्याने जबर जखमी झाले आहेत. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पुरुषोत्तम ऊर्फ अण्णा धारवाडकर असे मांजरीच्या सरपंचाचे नाव आहे. हडपसर पोलिसांनी नंदू शेडगे, चंद्रकांत घुले व त्यांच्या तीन साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मांजरीमधील श्रीराम हॉटेलमध्ये रात्री साडेनऊ वाजता घडली. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम धारवाडकर हे काही जणांसह रात्री श्रीराम हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यांच्या टेबलवर बसलेल्या संजय झुरंगे याचे चंद्रकांत घुले याच्याबरोबर भांडणे झाले. धारवाडकर यांचा त्याच्याशी काही संबंध नव्हता. भांडणानंतर घुले याने फोन करुन साथीदारांना बोलावून घेतले. धारवाडकर जेवण करुन हॉटेलमधून बाहेर पडत असताना तिघे जण मोपेडवरुन तेथे आले. त्यांच्यातील एकाने धारवाडकर यांच्या दिशेने गोळीबार केला. ती धारवाडकर यांना लागली नाही. त्यानंतर त्यांनी तेथे पडलेल्या दगड, विटांनी धारवाडकर यांना मारहाण केली. दगड डोक्यात घातल्याने त्यात ते जबर जखमी झाले. कोणी वाचवायला आले तर त्यांचीही अशीच गत करु अशी धमकी देऊन ते पळून गेले. धारवाडकर यांना तातडीने नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या डोक्यावर ८ टाके घालण्यात आले आहेत. सध्या त्यांची प्रकृती सुधारत आहे. हडपसर पोलीस (Hadapsar Police Station) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | firing on former sarpanch incident in manjri area of hadapsar pune

 

हे देखील वाचा :

Local Train Ticket Prices | रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी ! आजपासून AC लोकलचा प्रवास स्वस्त, सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणीच्या तिकीट दरात घट

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Pune NCP | महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज, तिकीट वाटपात ओबीसींना न्याय देणार; शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे आश्वासन

 

Related Posts