IMPIMP

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाची दौंड तालुक्यात मोठी कारवाई, भेसळयुक्त गूळाचा साठा जप्त

by nagesh
Pune Crime | Food and Drug Administration action against jaggery producer in Daund taluka

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) काल (बुधवारी) दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील मे. महाराज गूळ उद्योग उत्पादकाच्या (Maharaj Jaggery Industry) गुऱ्हाळ घरावर छापा टाकून 28 हजार 800 रुपये किंमतीचा सुमारे 324 किलो भेसळयुक्त गूळ तर 22 हजार 100 रुपये किंमतीची 650 किलो भेसळयुक्त साखर (Pune Crime) जप्त केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अन्न व औषध प्रशासनातर्फे भेसळयुक्त गूळ व साखर वापरणाऱ्या गूळ उत्पादकावर कारवाई (Pune Crime)
करताना या प्रकरणी घेण्यात आलेले दोन्ही नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत.
अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
तपासणीमध्ये आढळून आलेल्या त्रुटीच्या अनुषंगाने विक्रेत्याला 20 हजार रुपये तडजोड शुल्क इतका दंड (Penalty) आकारण्यात आला आहे.

 

याबाबत प्रशासनास मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असल्याने प्रशासनामार्फत लवकरच विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. याप्रकरणी गैरप्रकार आढळून येणाऱ्या गुऱ्हाळ घरावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
तरी जिल्ह्यातील सर्व गुऱ्हाळ चालकांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 या कायद्याअंतर्गत आवश्यक असलेला परवाना प्राप्त करुनच गूळ उत्पादन करावे.
याबाबतीत माहिती असल्यास प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकवर संपर्क साधण्याचे आवाहन
अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे (Pune Division) सहायक आयुक्त संजय नारागुडे
(Assistant Commissioner Sanjay Naragude) यांनी केले आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Food and Drug Administration action against jaggery producer in Daund taluka

 

हे देखील वाचा :

Chandrasekhar Bawankule | ‘अशोक चव्हाण यांनी जो दावा केला आहे त्याचा कट मातोश्रीवर शिजला असेल’, चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Vinayak Raut Vs Ramdas Kadam | विनायक राऊतांनी रामदास कदमांना डिवचले, म्हणाले – ‘रामदास कदम यांनीच शिवसेनेत गद्दारीची कीड रुजवली’

Pune Crime | झारखंडमधील विद्यापीठ प्रवेश पडला 55 हजारांना; महिलेने घातला गंडा

 

Related Posts