IMPIMP

Pune Crime | श्वानाला दगड मारल्याने एकावर कुर्‍हाडीने वार; बाणेरमधील घटना

by nagesh
Pune Crime | Women's jewelry looted on the pretext of sari distribution; Incident at Lal Mahal Chowk

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | पाळलेल्या श्वानाला दगड मारल्याने झालेल्या वादातून एकावर कुर्‍हाडीने वार करण्यात आल्याची
घटना बाणेर भागात घडली. या प्रकरणी श्वानाच्या मालकास चतु:शृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police) अटक केली. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अयुब बाशा शेख (वय ३६, रा. शिंदे मळा, कपील मल्हार सोसायटीजवळ, बाणेर – Baner) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शेख हा सोलापूर
पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal On Pune Police Record) आहे. शेख याने केलेल्या हल्ल्यात रवी घोरपडे (वय ४०, रा. शिंदे मळा,
कपील मल्हार सोसायटीजवळ, बाणेर) गंभीर जखमी झाला आहे. शेख बिगारी काम करतो. तर घोरपडे रंगारी आहे. दोघे शिंदे मळा भागातील वस्तीत
राहायला असून एकमेकांचे परिचित आहेत. (Pune Crime)

 

घोरपडे शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास शिंदे मळा परिसरातून निघाला होता.
त्या वेळी शेख याचे पाळीव श्वान घोरपडे याच्यावर भुंकले. घोरपडेने श्वानाला दगड मारला.
या कारणावरुन शेख हा थोड्यावेळाने घोरपडे याच्या घरी आला. कुत्र्याला दगड का मारला असे विचारुन घोरपडे यांच्या तोंडावर कुर्‍हाडीने वार केला. शेखने केलेल्या हल्ल्यात घोरपडे गंभीर जखमी झाला. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शेखला अटक करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक झरेकर (API Zarekar) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :-Pune Crime | For stoning a dog, one was stabbed with an axe; Incident in Baner

 

हे देखील वाचा :

Pune Crime | हॉटेलचे भाडे मागितल्यावरून टोळक्याकडून तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न; धनकवडीमधील घटना

Pune PMPML Bus | कोड स्कॅन करा अन् तिकीट मिळवा; ‘पीएमपीची नवी सुविधा

Pune Crime | सिंहगड रोड, मुंढव्यातून तडीपारांना अटक

Gadchiroli ACB Trap | पोलीस ठाण्यातच लाच घेताना पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Related Posts