IMPIMP

Pune Crime | हातचलाखी करुन ATM कार्ड घेऊन केली फसवणूक; काही मिनिटात कार्ड बदलून काढले पैसे

by nagesh
Pune Crime | Fraud by manipulating ATM cards Money exchanged in a few minutes

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | सफाई कामगार असलेल्या महिलेला एटीएम सेंटरमधून (ATM Center) पैसे काढून देताना त्याने कार्ड बदलले. ही बाब या महिलेला लक्षात आल्यावर तिने तातडीने शेजारीच असलेल्या बँकेत जाऊन कार्ड ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत चोरट्याने खात्यातून २० हजार रुपये काढून फसवणूक केली होती. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी ससून रुग्णालयात सफाई कामगार म्हणून काम करणार्‍या एका ३६ वर्षाच्या महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bund Garden Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १८४/२२) दिली आहे. ही घटना ससून हॉस्पिटल (Sasoon Hospital) येथील बँक ऑफ बडोदाच्या एटीएम सेंटरमध्ये गुरुवारी दुपारी सव्वा तीन वाजता घडली. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महिला या ससून रुग्णालयात सफाई कामगार म्हणून काम करतात.
पगार झाल्याने त्या ससून रुग्णालय परिसरातील बँक ऑफ बडोदाच्या एटीएम सेंटरमध्ये जाऊन पैसे काढत होत्या.
त्यांचा नंबर आल्यावर पैसे काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, पैसे निघाले नाही.
त्यावेळी त्यांच्या पाठीमागे उभे असलेल्या तरुणाने मी तुला पैसे काढून देतो, असे बोलून त्यांच्याकडील एटीएम कार्ड घेतले.
त्यांना पीन नंबर टाकण्यास सांगितले. त्यांनी पीन नंबर टाकत असताना त्याने तो पाहिला.
त्यांना प्रथम ४ हजार व नंतर १ हजार असे ५ हजार रुपये काढून दिले. पैसे काढून दिल्यावर त्यांना एटीएम कार्ड देऊन तो तरुण स्वत: पैसे काढण्याऐवजी निघून गेला. फिर्यादी या एटीएम सेंटर बाहेर आल्या असता त्यांच्या लक्षात आले की त्याने हातचलाखी करुन त्यांच्या एटीएम कार्ड ऐवजी बँक ऑफ इंडियाचे दुसर्‍याच नावाचे एटीएम कार्ड त्यांना दिले. तेव्हा फिर्यादी ताबडतोब शेजारीच असलेल्या बँक ऑफ बडोदामध्ये जाऊन आपले खाते ब्लॉक करण्यासाठी सांगितले. तोपर्यंत त्याने त्यांच्या खात्यातून १० हजार व १० हजार रुपये काढल्याचे मेसेज त्यांना आले. पोलीस उपनिरीक्षक गावडे तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Fraud by manipulating ATM cards Money exchanged in a few minutes

 

हे देखील वाचा :

Nitin Gadkari On Bio-Ethanol And Green Hydrogen | नितिन गडकरी यांचा मोठा दावा; म्हणाले – ‘पुढील 5 वर्षात देशात बॅन होईल पेट्रोल’

MNS On Eknath Shinde | मनसेचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा; म्हणाले – ‘ठाण्याला पंतप्रधानपद दिले तरी समस्या कायम’

MNS Criticizes Aditya Thackeray | ‘शिल्लक’सेना म्हणत मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला

 

Related Posts