IMPIMP

Nitin Gadkari On Bio-Ethanol And Green Hydrogen | नितिन गडकरी यांचा मोठा दावा; म्हणाले – ‘पुढील 5 वर्षात देशात बॅन होईल पेट्रोल’

by nagesh
Nitin Gadkari Threat Case | the mystery of the nitin gadkari threat case has increased that girl in hospital

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाNitin Gadkari On Bio-Ethanol And Green Hydrogen | देशात पेट्रोल बंदीची (Petrol Ban) कल्पनाही सामान्य माणूस करू शकत नाही, पण येत्या 5 वर्षात देशात पेट्रोलवर बंदी येईल आणि देशात त्याची गरज भासणार नाही, असा दावा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. गडकरी यांच्या या दाव्याची सत्यता भविष्यातच कळेल, परंतु देशात पेट्रोलला स्वस्त पर्याय मिळाल्यास सर्वसामान्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 36 व्या दीक्षांत समारंभात गुरुवारी बोलताना गडकरी (BJP Leader And Union Minister) यांनी आगामी काळात देशात पेट्रोलवर बंदी घालण्यात येणार असल्याचा दावा केला. यावेळी कृषी विद्यापीठाने गडकरींना ’डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवीही प्रदान केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगतसिंग कोश्यारी (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari) होते.

 

शेतकर्‍यांनी व्हावे ऊर्जा प्रदाता

केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, आता विदर्भात बनवलेले बायो-इथेनॉल वाहनांमध्ये वापरले जात आहे. ग्रीन हायड्रोजनची निर्मिती विहिरीच्या पाण्यापासून करता येते आणि ते 70 रुपये किलो दराने विकता येते. (Nitin Gadkari On Bio-Ethanol And Green Hydrogen)

ते म्हणाले की, येत्या पाच वर्षांत देशात पेट्रोल संपेल. केवळ गहू, तांदूळ, मका आदी पारंपरिक पिके घेऊन शेतकर्‍याचे भविष्य उज्ज्वल होऊ शकत नाही. आता शेतकर्‍याला काही तरी वेगळे करावे लागेल. गडकरी म्हणाले की, शेतकर्‍यांनी आता अन्नदात्यासह ऊर्जा दाता बनण्याची गरज आहे. (Nitin Gadkari On Bio-Ethanol And Green Hydrogen)

 

इथेनॉल आहे बचतीचे भांडार

गडकरी म्हणाले की, इथेनॉलच्या एका निर्णयामुळे देशाची 20,000 कोटी रुपयांची बचत झाली आहे.
नजीकच्या काळात दुचाकी आणि चारचाकी वाहने ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल आणि सीएनजीवर आधारित असतील.

केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, विदर्भातून बांगलादेशात कापूस निर्यात करण्याची योजना आहे,
ज्यासाठी विद्यापीठांचे सहकार्य आवश्यक आहे.
विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विद्यापीठे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :-  Nitin Gadkari On Bio-Ethanol And Green Hydrogen | nitin gadkari made a big claim petrol may be banned in the country in the next 5 years

 

हे देखील वाचा :

MNS On Eknath Shinde | मनसेचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा; म्हणाले – ‘ठाण्याला पंतप्रधानपद दिले तरी समस्या कायम’

MNS Criticizes Aditya Thackeray | ‘शिल्लक’सेना म्हणत मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला

Amruta Fadnavis | अमृता फडणवीसांची पतीसाठी खास पोस्ट; नागपूर दौर्‍याचे फोटो शेअर करत म्हणाल्या…

 

Related Posts