IMPIMP

Pune Crime | शेअर मार्केट कंपनी असल्याचे भासवून साडेसात लाखाची फसवणूक

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Lonikand Police Station - Fraud of a senior citizen by using fake purchase documents on the pretext of renting a place

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | शेअर मार्केट कंपनी (Stock Market Company) असल्याचे भासवून साडेसात लाख रुपयांची फसवणूक (Cheating) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रकाश रंगराव पाटील Prakash Rangrao Patil (वय – 49 रा. वाल्हेकरवाडी (Walhekarwadi), चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी वेगवेगळ्या मोबाईल धारकांवर गुन्हा (FIR) दाखल केला (Pune Crime) आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

हा प्रकार 27 जुलै 2021 ते 16 डिसेंबर 2021 या कालावधीत वाल्हेकरवाडी येथील रजनीगंधा हाउसिंग सोसायटी येथे घडला आहे. याबाबत प्रकाश पाटील यांनी गुरुवारी (दि. 5) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आयपीसी 406, 419, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे.(Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांची शेअर मार्केट कंपनी आहे, असे भासवले. फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना फसवणुकीचा इराद्याने पैसे देण्यास भाग पाडले. स्टेडी अ‍ॅपवर (Steady App) फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांची 7 लाख 55 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्यंकट पोटे (PSI Venkat Pote) करीत आहेत.

 

मागील काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत.
नागरिकांनी पैशांची गुंतवणूक करत असताना योग्य ती काळजी घ्यावी असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.

 

 

Related Posts