IMPIMP

Pune Crime | गुंतवणुकीवर अवास्तव नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून हडपसरमधील तरूणाची साडेपाच लाखांची फसवणुक

by nagesh
Cheating Fraud Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | शेअर मार्केटमध्ये (Share Market) मोठ्या प्रमाणावर नफा मिळत असल्याचा समज पसरविण्यात
आला आहे. त्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन आमच्या कंपनीमार्फत शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा, दुप्पट, तिप्पट फायदा मिळवून देतो, असे सांगून
फसवणुकीचा (Cheating Case) नवा फंडा आला आहे. एका तरुणाची साडेपाच लाख रुपयांची फसवणूक (Fraud Case) करण्यात आल्याचा प्रकार
समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी हडपसरमधील (Hadapsar) एका ३६ वर्षाच्या तरुणाने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २६६/२२) दिली आहे. त्यावरुन इम्रानखान इनामदार (रा. बास्तेवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर – Kolhapur) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
इम्रानखान याची स्वत:ची टाईन एग्रो नावाची कंपनी आहे.
त्याच्या शेअर्समध्ये पैसे गुंतविल्यास गुंतवणुकीवर अनुक्रमे ३० हजार रुपयांला १ लाख २० हजार रुपये व २० हजाराला ६० हजार रुपये परतावा मिळेल, असे सांगितले.
त्यानुसार फिर्यादी याने एकूण ५० हजार रुपये गुंतवणुक केली.
फिर्यादीचे कोणतेही शेअर ट्रेडिंगसाठी डिमॅट अकाऊंट (Share Trading Demat Account) नसताना व फिर्यादीला शेअर मार्केटचे कामकाजाबाबत काहीएक माहिती नसताना एजंट म्हणून काम करताना दाखविले.
टाईन एग्रो शेअर्सचे स्लॉट खरेदी केल्याचे भासवले. या शेअर्सची किंमत वाढून त्यांची एकूण किंमत ५ लाख ४८ हजार रुपये झालेली दाखविली.
प्रत्यक्षात कोणतेही शेअर्स खरेदी न करता व त्याप्रमाणे कोणताही परतावा दिला नाही.
मात्र, बँकेत परताव्याचे पैसे भरल्याची खोटी पावती फिर्यादीला पाठवून ५ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक केली.
फिर्यादी यांनी पैसे परत मागितले असता त्यांना फोनवरुन शिवीगाळ केली.
त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.
सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Hadapsar youth cheated of Rs 5.5 lakh on the pretext of making unrealistic return on investment

 

हे देखील वाचा :

Diabetes Control | डायबिटीजच्या रूग्णांसाठी इन्सुलिनपेक्षा कमी नाहीत ‘या’ 6 पाच वनस्पती, वाढू देत नाहीत ब्लड शुगर

Maharashtra Political Crisis | ‘त्या’ १६ आमदारांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा ; सुनावणी होईपर्यंत कारवाई नको

Pune Crime | खळबळजनक ! आळंदी नगराध्यक्षांच्या सुनेची गळफास घेऊन आत्महत्या

 

Related Posts