IMPIMP

Pune Crime | पुत्रप्राप्तीसाठी विवाहितेचा केला छळ; काळे कपडे न वापरणे, माताने दिलेले कुंकु दिवसा रात्री झोपताना लावण्याची करत होते सक्ती

by nagesh
 Pune Crime News | A case has been filed against the moneylender who demanded 55 thousand even after returning 2.5 lakh on 50 thousand, FIR in Chandannagar police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | मुल होण्याकरीता विवाहितेला काळे कपडे न वापरणे, त्यांच्या मातादीदीने दिलेले कुंकु दिवसा व रात्री
झोपताना लावण्याची जबरदस्ती करुन विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी एका २६ वर्षाच्या महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४८८/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती, दीर, सासु सासरे यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचारासह (Domestic Violence) जादुटोणा प्रतिबंध कायद्याखाली (Witchcraft Prohibition Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार शेवाळवाडी येथे २७ डिसेंबर २०२० ते २० एप्रिल २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या सासरकडील लोक माता निर्मला देवी (Nirmala Devi) यांच्या आश्रमात (Ashram) जात असतात.
त्यांचा विवाह झाल्यानंतर त्यांना मुल होण्याकरीता काळे कपडे घालून देत नसत.
तसेच आश्रमातून आणलेले कुंकु दिवसा रात्री झोपताना लावणे अशी जबरदस्ती त्यांच्यावर केली जात असे.
तसेच त्यांचा पती त्यांच्याशी अनैसर्गिक संबंध करत.
त्या गर्भवती असल्याचे माहिती असतानाही त्यांच्याशी संबंध केल्याने गर्भस्त्राव होण्यास कारणीभूत ठरून त्यांचा गर्भपात घडून आला.
तसेच फिर्यादी यांना नांदवण्यास नकार देऊन त्यांचा शारीरीक व मानसिक छळ केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Harassment of a married woman for having a son; Not wearing black clothes, forced to wear kunku given by mother during day and night while sleeping

 

हे देखील वाचा :

Pune Crime | महिलेस कंडोमचे पाकीट दाखवून तुम्ही आम्हाला खुश करण्यासाठी असता म्हणणार्‍या व्यावसायिक पिता-पुत्रावर गुन्हा

Nashik ACB Trap | 35 हजार रुपये लाच मागणारे दोन पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Aditya Thackeray | वेदांतानंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला, आदित्य ठाकरेंचा नवा आरोप (व्हिडिओ)

 

Related Posts