IMPIMP

Pune Crime | अमेरिकन कंपनीच्या फसवणूकप्रकरणी ‘पॅकस्पेस एंटरप्राइजेस’च्या हार्दिक ओसवाल, दीपक सुतार आणि प्रदीप तांगडे यांच्याविरूध्द गुन्हा

by nagesh
Pune Crime | Vehicles vandalized in Narhe area of pune sinhagad road police station

पुणे न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील ‘न्यूयॉर्क पॅकेजिंग आयआय एलएलसी’ या (New York Packaging II LLC company) कंपनीला पेपर बॅग आणि हॅन्डग्लोव्हज पुरवण्यासाठी ऍडव्हान्स रक्कम घेऊन त्यांना माल न पुरविता तब्बल 3 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पुण्यातील नऱ्हे येथील ‘पॅकस्पेस एंटरप्राइजेस’ या (Packspace Enterprises) कंपनीच्या मालकांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात (sinhagad police station) गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा (Pune Crime) दाखल झालेल्यांमध्ये हार्दिक ओसवाल (Hardik Oswal), दीपक सुतार (Deepak Sutar) आणि प्रदीप तांगडे (Pradip Tangde) यांचा समावेश आहे.

या प्रकरणी अ‍ॅड. पायल भाविन गडा Adv. Payal Bhavin Gada (वय 41, रा. वरळी नाका, मुंबई)
यांनी फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे (senior police inspector devidas gheware) यांनी दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅड. पायल गडा या अमेरिकन कंपनीच्या भारतातील लीगल ॲडव्हायझर (legal advisor Adv. Payal Bhavin Gada) आहेत.
या कंपनीने गडा यांना खरेदी विक्रीबाबतचे हक्क दिलेले आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

त्यांनी आरोपींना पेपर बॅग आणि हॅन्डग्लोव्हजची ऑर्डर दिली होती.
ही पर्चेसिंग ऑर्डर घेतल्यानंतर आरोपींनी इन्व्हाईसद्वारे कंपनीला पेपर बॅग पुरविल्या.
त्यानंतर कंपनीकडून हॅन्डग्लोव्हजची मागणी करण्यात आली.
आरोपींनी गडा यांच्याकडून त्याकरिता तीन कोटी रुपये (चार लाख चार हजार अमेरिकन डॉलर) एवढी रक्कम ऍडव्हान्स स्वरूपात स्वीकारली.
मात्र, त्यांना हॅन्डग्लोज पाठविले नाहीत. याबाबत विचारणा केली असता हा माल समुद्रमार्गे पाठवीत असल्याचे वारंवार खोटे सांगितले.
आरोपींनी कंपनीची फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार अर्ज दाखल केला. पोलिसांनी तक्रार अर्जावरून चौकशी केली.
या चौकशीमध्ये पॅकस्पेस एंटरप्राइजेसने फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याचे निरीक्षक घेवारे (senior police inspector devidas gheware) यांनी सांगितले.

 

Web Title : Pune Crime | Hardik Oswal, Deepak Sutar and Pradip Tangde of Packspace Enterprises charged in US company fraud case in sinhagad police station of pune

 

हे देखील वाचा :

LPG Cylinder Subsidy | तुम्हाला सुद्धा LPG वर सबसिडी मिळत नाही का?, चेक करा ‘हे’ कारण तर नाही ना? खुप सोपी आहे पद्धत, जाणून घ्या

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 238 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

India Post Recruitment 2021 | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये 2357 जागेसाठी भरती; जाणून घ्या

Cyrus Poonawalla | शरद पवारांच्या मित्राकडून PM मोदींचं कौतुक

 

 

 

Related Posts