IMPIMP

Pune Crime | पुण्यात मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान चालविणाऱ्या केंद्राचा पर्दाफाश; ग्रामीण पोलिसांकडून तिघांवर FIR

by nagesh
Pune Crime News | Accused who threatened to kill family of chartered accountant and demanded extortion of 30 lakhs arrested by crime branch

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र चालविण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर (Pune Crime) आला आहे. इंदापूर पोलीस (Indapur Police) आणि वैद्यकीय विभागाने (Medical Department) बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राचा (Illegal Gestational Diagnosis Center) पर्दाफाश केला आहे. पोलिसांकडून (Pune Rural Police) कारवाई करण्यात आली असून तिघांविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याजवळील मोटार आणि गर्भलिंग निदान यंत्रणा पोलीसांनी जप्त केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी प्रवीण पोपटराव देशमुख (Praveen Popatrao Deshmukh) (वय 32, रा. राजळे, सातारा), तौशिफ अहमद शेख (Toushif Ahmed Shaikh) (वय 20, दोघे रा. राजळे, सातारा) तसेच एका विरोधात इंदापूर पोलिसांनी (Indapur Police Station) गुन्हा दाखल केला आहे. देशमुख एका रोगनिदान केंद्रात तंत्रज्ञ आहे. त्याच्याविरोधात गर्भधारण पूर्व प्रसव, पूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) 1994 च्या सुधारित 2003 कायद्यान्वये गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. (Pune Crime)

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र चालविले जात असल्याची माहिती इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष खामकर (Dr. Santosh Khamkar) यांना मिळाली. त्यानंतर डॉ. खामकर आणि डॉ. एकनाथ चंदनशिवे (Dr. Eknath Chandanshive), डॉ. श्रीकृष्ण खरमाटे (Dr. Shrikrishna Kharmate), डॉ. अमोल खनावरे (Dr. Amol Khanaware) यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर वैद्यकीय तज्ज्ञ आणि पोलिसांच्या पथकाने मोटारीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

इंदापुर-अकलूज रस्त्यावर (Indapur-Akluj Road) दुचाकीवरून दाम्पत्य आले होते. दाम्पत्य मोटारीत बसले आणि मोटार भरधाव वेगाने निघाली. भांडगाव परिसरात एका ओढ्याजवळ मोटार थांबली. पोलीस आणि वैद्यकीय तज्ज्ञांचे पथकही तेथे दाखल झाले. त्यावेळी मोटारीची तपासणी केली असता बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र चालविले जात असल्याचे आढळले. त्यानंतर मोटारचालक शेख, देशमुख तसेच पत्नीची गर्भलिंग निदान चाचणी (Gestational Diagnosis Test) करण्यासाठी आलेल्या एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

 

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh), अतिरिक्त अधीक्षक मिलिंद मोहिते (Addl SP Milind Mohite), उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे (DySP Ganesh Ingle) यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस ठाण्यातील पथकाकडून करण्यात आली.

 

 

Web Title : Pune Crime | Illegal Gestational Diagnosis Center in Pune exposed; FIR against three from pune rural indapur police

 

हे देखील वाचा :

Health Tips | रिकाम्या पोटी ‘चहा’ पिता का?; चांगलं की वाईट? जाणून घ्या सविस्तर

Pravin Tarde’s historical film Sarsenapati Hambirrao | छत्रपती संभाजी महाराज यांची आक्रमकता दाखवणारा महाराष्ट्राचा महासिनेमा “सरसेनापती हंबीरराव” चा ट्रेलर प्रदर्शित

Solapur Crime | खळबळजनक ! पोटच्या दोन मुलांना विष पाजून आईनं संपवलं जीवन

 

Related Posts