IMPIMP

Pune Crime | घरफोडी करणाऱ्या 3 सराईत गुन्हेगारांना लोणीकाळभोर पोलिसांकडून अटक, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

by nagesh
Pune Crime | Lonikalbhor police arrest 3 burglars seize Rs 1.5 lakh

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | लोणी काळभोर परिसरात घरफोडी (Burglary) करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) अटक (Arrest) केली आहे. त्यांच्याकडून घरफोडीच्या गुन्ह्यातील दीड लाखांचे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (Gold Jewelry) जप्त केले आहेत. पोलिसांनी ही कारवाई वडकी (Wadki) परिसरात सापळा (Pune Crime) रचून केली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शाहरुख विजय पवार Shah Rukh Vijay Pawar (वय-27), बाज्या विजय पवार Bajya Vijay Pawar (वय-21), देवगुन विजय पवार Devgun Vijay Pawar (वय-19 सर्व रा. माप्तेमळा, ता. आटपाडी Atpadi, जि. सांगली Sangli) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत यल्लाप्पा कलाप्पा सन्नके Yallappa Kalappa Sannake (रा. होळकरवाडी मुळ रा. सोलापूर Solapur) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे गावी गेल्यानंतर त्यांच्या घराचे कुलुप तोडून घरातील 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरुन (Stealing) नेले होते. (Pune Crime)

 

घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकातील (Investigation Team) पोलीस अंमलदार नितीन गायकवाड (Nitin Gaikwad) व सुनिल नागलोत (Sunil Naglot) यांना हा गुन्हा सराईत गुन्हेगार शाहरुख पवार व त्याच्या भावांनी केला असल्याची माहिती मिळाली. तसेच ते वकडी परिसरात आले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी वडकी परिसरात तिघांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी देवगुन पवार हा लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन घरफोडीच्या गुन्ह्यात फरार होता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil),
सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi),
पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे (Police Inspector Subhash Kale)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर (API Raju Mahanor), दिगंबर बिडवे, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, सुनिल नागलोत, श्रीनाथ जाधव, संभाजी देविकर, दिगंबर साळुंके यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Lonikalbhor police arrest 3 burglars seize Rs 1.5 lakh

 

हे देखील वाचा :

Pune Crime | दहशत निर्माण करण्यासाठी कोयत्याने केक कापून व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल, अल्पवयीन गुन्हे शाखेच्या ताब्यात

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात 964 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Dattatray Bharne | राज्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख

 

Related Posts