IMPIMP

Pune Crime | सराईत वाहनचोरांना लोणीकाळभोर पोलिसांनी केली अटक, पावणे तीन लाखांची वाहने जप्त

by nagesh
Pune Crime | Lonikalbhor police arrested vehicle thieves and confiscated three lakh vehicles

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | घराच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या दुचाकी चोरणाऱ्या (Vehicle Theft) सराईत गुन्हेगारांना लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 2 लाख 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला (Pune Crime) आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये एक चारचाकी (Four-Wheeler), रिक्षा (Rickshaw) आणि दुचाकींचा (Two-Wheeler) समावेश आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

विनोद सदाशिव पवार (वय – 31 रा. घुले वस्ती, मांजरी रोड, मांजरी ता. हवेली), निवृत्ती दत्तात्रय बर्डे (वय – 31 रा. गोपाळपट्टी, मांजरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत सागर दत्तात्रय लोंढे (रा. राईकर हॉस्पिटलमागे, कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांनी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची पॅशन प्लस दुचाकी (एमएच 12 एफ. जी 2145) घराच्या पार्किंगमध्ये लावली होती. अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरुन नेली. या गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार संभाजी देविकर (Sambhaji Devikar) व शैलेश कुदळे (Shailesh Kudale) यांना हा गुन्हा विनोद पवार याने त्याच्या इतर साथिदारांच्या मदतीने केल्याची माहिती मिळाली.

 

त्यानुसार पोलिसांनी विनोद आणि निवृत्ती या दोघांना अटक करुन चौकशी केली.
चौकशी दरम्यान त्यांनी त्यांचा तिसरा साथिदार सागर पवार याच्या मदतीने वाहन चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी विनोद पवार याच्याकडून गुन्ह्यात चोरलेली दुचाकी, मारुती 800, पॅशन प्लस, रिक्षा असा एकूण 2 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपींकडून लोणीकाळभोर पोलीस ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे (PSI Hanumanth Tarte) करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan), पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil), सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi),
पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे (Police Inspector Subhash Kale)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर (API Raju Mahanor), पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे,
पोलीस नाईक संभाजी देविकर, पोलीस कॉन्स्टेबल बाजीराव विर, शैलेश कुदळे, निखील पवार, अजिंक्य जोजारे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Lonikalbhor police arrested vehicle thieves and confiscated three lakh vehicles

 

हे देखील वाचा :

TET Exam Scam | प्रितीश देशमुखने 20 लाख दिलेला हरीदास ठोळ कोण ? टीईटी गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता

Mumbai Crime | महिलेच्या ‘शीला’ची किंमत PSI ने 30 लाख लावल्याने राज्यभर संताप ! ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजेवर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Pune Crime | पुण्यातील कोंढवा परिसरात राष्ट्रीय तपास यंत्रणेची (NIA) छापेमारी; इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेस व कागदपत्रे जप्त

 

Related Posts