IMPIMP

Pune Crime | पुण्यातील वारजेमध्ये तरुणाच्या डोक्यात वार करुन खून, दुसरा गंभीर जखमी

by nagesh
Pune Crime | Criminals robbed the couple in the Bopadev ghat, attacked them with a sword and looted their mobile and Mangalsutra

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | एकाच रुममध्ये राहणार्‍या एकाने आपल्या दोन सहकार्‍यांवर कठीण वस्तूने डोक्यात वार केले. त्यात एकाचा मृत्यु झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना वारजे (Warje Malwadi) येथील न्यू अहिरे गावात बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास (Pune Crime) घडली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

रामपूजन महेंद्रर शर्मा (वय २२, रा. मुळगाव शंकरपूर, दरभंगा, बिहार) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर रामभरोस शर्मा (वय २१) हा जखमी झाला आहे. याबाबतची माहिती अशी, रामपूजन हा सुतारी काम करीत असत. हे तिघेही मुळचे बिहारचे राहणारे असून गेल्या काही काळापासून गणपती माथा येथील रुममध्ये एकत्र राहत होते. त्यांच्यात काही कारणावरुन वाद झाला.

 

त्यानंतर हरिकुमार शर्मा याने रामपूजन व रामभरोस यांच्या डोक्यात कठीण वस्तूने घाव (Pune Crime) घातले.
त्यात रामपूजन याचा मृत्यु झाला. रामभरोस याला पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले आहे.
पोलिसांनी आरोपींला ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक अमृत मराठे (police inspector amrut marathe) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Murder by stabbing a young man in the head in Warje Malwadi, Pune, another seriously injured

 

हे देखील वाचा :

Gautam Gambhir | माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरला ‘इसिस काश्मीर’कडून जीवे मारण्याची धमकी

Cryptocurrency Bill 2021 | भारतात सर्व खासगी क्रिप्टोकरन्सीवर प्रतिबंध ! मोदी सरकार हिवाळी अधिवेशनात संसदेत सादर करणार क्रिप्टोकरन्सीसह 26 बिले (विधेयके)

Gold Price Today | सोन्याच्या दरात किंचित वाढ पण दर 48 हजारांपेक्षा कमीच, जाणून घ्या आजचा भाव

 

Related Posts