IMPIMP

Pune Crime | पुरंदर तालुक्यातील दिवे गावात दारु पिण्याच्या वादातून दिवे येथे एकाचा निर्घुण खून

by nagesh
Pune Crime | Gangsters kill youth for not returning betting money; Incident in Ambegaon

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | दारु पिण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणाच्या रागातून दोघा जणांनी एकावर तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर, तोंडावर वार करुन त्याचा निर्घुण खून केला. ही घटना पुरंदर (Purander) तालुक्यातील दिवे गावात घडली. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अशोक लक्ष्मण भापकर (वय ५६, रा. भापकर मळा, दिवे, ता. पुरंदर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी लता अशोक भापकर यांनी सासवड पोलीस ठाण्यात (Saswad Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संजय बबन भापकर व किरण झेंडे (दोघे रा. दिवे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २५ जानेवारी रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता भापकर मळा येथे घडली. (Pune Crime)

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक भापकर आणि संजय भापकर, किरण झेंडे यांच्यात काळेवाडीच्या ढाब्यावर दारु पिण्याच्या कारणावरुन भांडणे झाली होती. या भांडणाच्या रागातून संजय भापकर, किरण झेंडे हे मध्यरात्री अशोक भापकर यांच्या घरी आले. अशोक भापकर यांना घराबाहेर बोलावले. त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने डोक्यात, तोंडावर वार करुन त्यांचा खून (Murder in Pune) केला. या घटनेची माहिती मिळाल्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील (SDPO Dhananjay Patil) यांनी घटनास्थळाला भेट दिली असून सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप (Police Inspector Annasaheb Gholap) अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title : Pune Crime | Murder of a person at Dive in Purandar taluka due to a drinking dispute

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात मोबाईल आणून न दिल्याने मुलाच्या पोटात चाकूने भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न

Omicron Covid Variant | ओमिक्रॉनपासून वाचण्यासाठी कोणती फळे आणि भाज्यांचे सेवन आवश्यक? जाणून घ्या सविस्तर

Lata Mangeshkar | लता मंगेशकर यांच्या प्रकृतीसाठी महामृत्युंजय मंत्राचा जप, साधू PM मोदींकडे मागणी करत म्हणाले…

Weight Loss Tips | लठ्ठपणाने त्रस्त आहात का? ‘या’ सोप्या पद्धतीने कमी करा पोटावर जमा झालेली चरबी

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 8,334 रुपये मासिक जमा केल्यास मिळतील 7 लाख रुपये, जाणून घ्या सविस्तर

Padma Bhushan Award | सायरस पुनावाला यांना ‘पद्मभूषण’, राज्यातील ‘या’ 10 जणांना ‘पद्म’ पुरस्कार

 

Related Posts