IMPIMP

Pune Crime | ‘चाकण’च्या हद्दीत भर चौकात कुस्ती तालीम चालवणारे पैलवान नागेश कराळे यांची गोळ्या झाडून हत्या; पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचंड खळबळ

by nagesh
Nanded Firing Case | nanded firing case woman congress worker firing in nanded three people

चाकण : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | कुस्ती तालीम चालवणारे पैलवान नागेश सुभाष कराळे Nagesh Subhash Karale (वय-38) यांची भर चौकात गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. हल्लेखोरांनी त्यांच्यावर 4 गोळ्या झाडल्याचे समोर आले असून जुन्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Pimpri-Chinchwad Police) तत्काळ सर्वत्र नाकाबंदी केली असून हल्लेखोरांचा कसून शोध घेत आहे. या घटनेमुळे पुण्यासह (Pune Crime) पिंपरी-चिंचवड परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

 

मिळलेल्या माहितीनुसार, शेलपिंपळगाव (Shelpimpalgaon) येथील मिलिंद बिअर शॉपी जवळ गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास नागेश कराळे हे आपल्या चारचाकी गाडीत बसत असताना एका गाडीत दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना चाकण (Chakan) येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू (Pune Crime) झाल्याचे घोषित केले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी  धाव घेऊन पाहणी केली.

 

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कराळे यांच्यावर हल्ला हा जुन्या वादातून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.
पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी चार पथके रवाना केली असून काही जणांकडे चौकशी सुरू केली आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास चाकण पोलीस आणि गुन्हे शाखेचे (Pimpri Chinchwad Police Crime Branch) पोलीस करत आहेत.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

Web Title :- Pune Crime | murder of nagesh subhash karale in shelpimpalgaon near chakan pimpri chinchwad police crime branch investigation going on

 

हे देखील वाचा :

Varsha Gaikwad | दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी वाढवली मुदत, घेतला ‘हा’ मोठा निर्णय; शालेय शिक्षण मंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती (व्हिडिओ)

Debit Card Fraud | डेबिट कार्ड फ्रॉडच्या नवीन पद्धती वापरताहेत सायबर गुन्हेगार, बचावासाठी ‘या’ सूचना जाणून घ्या

BJP MLA Nitesh Rane | ‘…म्हणून मी आदित्य ठाकरे जात असताना म्याव, म्याव केलं’ – नितेश राणे

 

Related Posts