IMPIMP

Pune Crime News | शिवाजीनगर गावठाणातील गुंडावर विनयभंगाचा गुन्हा; भर रस्त्यात तरुणीबरोबर अश्लिल चाळे

by nagesh
Pune Crime News | A case of molestation against a goon in Shivajinagar village; Obscene chale with a young woman on the street

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | भाईगिरी करण्यासाठी जंगली महाराज कॉर्नर (JM Road, Pune) येथील स्टॉलवर दगडफेक
करुन तोडफोड करणारा तसेच गावठाणातील वाहनांची तोडफोड करणार्‍या गुंडाच्या टोळक्यावर आता तरुणीचा विनयभंग (Molestation Case)
केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आदित्य वडसकर (वय १९, रा. बहिरट आळी, शिवाजीनगर गावठाण) आणि विशाल शंकर सिंह (वय १९, रा. संगमवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. त्याचे साथीदार आयुश गायकवाड (वय १८) आणि तन्मय गुजर (वय १९) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शिवाजीनगर गावठाण येथील सार्वजनिक रोडवर ३१ डिसेबर रोजी सायंकाळी साडे सात वाजता घडला होता. (Pune Crime News)

 

याबाबत एका २० वर्षाच्या तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद
(गु. रजि. नं. १०/२३) दिली आहे.
जंगली महाराज मंदिरासमोरील खाऊ गल्लीतील खादय पदार्थांच्या स्टॉलवर आदित्य वडसकर व त्याच्या साथीदारांनी हल्ला करुन तोडफोड केली होती.
त्यानंतर त्याच रात्री शिवाजीनगर गावठाणात पार्क केलेल्या होंडा सिटी कार, मोटारसायकल, रिक्षा यांच्यावर दगडफेक करुन त्यांची तोडफोड केली होती.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आदित्य वडसकर व त्याच्या साथीदाराला अटक केली.
त्यानंतर त्याचे कारनामे आता पुढे येऊ लागले आहेत. फिर्यादी तरुणी ३१ डिसेबर रोजी सायंकाळी साडे सात वाजता दुचाकीवरुन जात असताना आदित्य याने तिला अडविले. आता लक्ष २०२३, २०२३ चा बादशाह मीच, बदला अभी बाकी आहे़ अशी धमकी दिली. फिर्यादी यांच्या अंगाला स्पर्श करुन त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. ते पाहून अवी भाई किंग ऑफ गावठाण असे म्हणून त्याला इतरांनी प्रोत्साहन दिले. या प्रकाराची आता फिर्याद देण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक अहिवळे (API Ahiwale) तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | A case of molestation against a goon in Shivajinagar village; Obscene chale with a young woman on the street

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे स्टेशनवरुन ६ वर्षाच्या मुलाला पळवून नेले गुलबर्गाला; मुलाला पळविणार्‍याला केली अटक

Prakash Ambedkar | … तर शिंदे गटाला पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी ठेवली अट

Pune Crime News | वीजेचा धक्का लागून मुलाच्या मृत्यु प्रकरणी महावितरणच्या अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल

 

Related Posts