IMPIMP

Pune Crime | पुण्यातील भाजप नगसेवक धनराज घोगरे यांच्या विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल; एका वकिलासह 5 जणांचा समावेश, प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Crime | Earlier a youth was stabbed and six others were remanded in police custody

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | महापालिकेतील (PMC) कामे मिळवून देतो, असे सांगून ठेकेदारांकडून ३ लाख रुपये घेतल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात भाजप नगरसेवकाने (BJP Corporator Dhanraj Ghogre) फिर्यादीचे अपहरण करुन कुटुंबाला संपविण्याची धमकी देऊन अ‍ॅफिडेव्हिटवर जबरदस्तीने सह्या घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठेकेदाराने लघवीचा बहाणा करुन कोर्टातून पलायन करुन दत्तवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने हा प्रकार (Pune Crime) उघडकीस आला.

निखील रत्नाकर दिवसे (वय ३२, रा. घोरपडी पेठ) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात Dattawadi Police Station (२४४/२१) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी नगरसेवक धनराज घोगरे (BJP Corporator Dhanraj Ghogre), सहदेव लक्ष्मण ढावरे (वय ४२, रा. पर्वती दर्शन), सुरेश तेलंग, विनोद माने पाटील, अ‍ॅड. अतुल पाटील (Adv. Atul Patil), तसेच घोगरे यांच्या कार्यालयात काम करणारे इतर दोघांविरुद्ध ३६३, ४६८, ३४ कलमाखाली गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

महापालिकेत (Pune Corporation)काम मिळवून देतो, असे सांगून नगरसेवक घोगरे यांनी निखील दिवसे यांच्याकडून ३ लाख रुपये घेतले होते.
त्यांनी काम मिळवून न दिल्याने शेवटी दिवसे यांनी पैसे परत मागितले.
तेव्हा घोगरे व इतर चौघांनी त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली होती.
त्याबद्दल वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या तक्रारीबाबत बोलण्यासाठी सहदेव ढावरे याने फिर्यादीला फोन करुन पर्वती दर्शनला बोलावून घेतले. त्यानुसार गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दिवसे तेथे गेले. तेव्हा आरोपींनी फिर्यादी व त्यांचे कुटुंबाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. त्यांना मोटारसायकलवरुन अ‍ॅड. अतुल पाटील यांच्या कार्यालयात नेले. तेथे अगोदरच तयार केलेल्या अ‍ॅफिडेव्हिटवर सह्या घेऊन वानवडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी वापरण्यासाठी त्यांना शिवाजीनगर कोर्टात आणले.  फिर्यादी यांनी कोर्टातील नाझर यांना ते अ‍ॅफिडेव्हिट त्यांचे नाही तर फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना संपविण्यासाठी भिती दाखवून दमदाटी करुन जबरदस्तीने करुन घेतले आहे, असे सांगितले व लघवीचा बहाणा करुन दिवसे तेथून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांच्या तावडीतून पळून गेले.

दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन सहदेव ढावरे याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक कामठे अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title: Pune Crime | one more case registered against bjp corporator Dhanraj Ghogre in pune dattawadi police station

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | दिवाळीआधी खूशखबर ! सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या

CM Uddhav Thackeray | ‘लोकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करावा यासाठी केंद्र सरकारकडून इंधन दरवाढ’

Madhav Bhandari | ‘परीक्षेच्या गोंधळाबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपेंची न्यायालयीन चौकशी करा’

 

Related Posts