IMPIMP

Pune Crime | एकतर्फी प्रेमातून गंज पेठेत भर रस्त्यात महिलेला जीवे मारण्याची धमकी !

by nagesh
Pune Crime | Sexually assaulting a young woman by luring her into marriage; When asked about the marriage, they threatened to make the video viral

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | एकतर्फी प्रेमातून (One Sided Love) एका महिलेचा सातत्याने पाठलाग करुन तिने विरोध करताच
तिला भर रस्त्यात अडवून जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी (Khadak Police) एकाला अटक
केली आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कैलास ऊर्फ राजू बजरंग कांबळे Kailas alias Raju Bajrang Kamble (वय ५०, रा. पी एम सी कॉलनी, महात्मा फुले पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी पद्मावती येथे राहणार्‍या एका ३७ वर्षाच्या महिलेने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. गेल्या चार वर्षापासून १७ फेब्रुवारीपर्यंत कैलास कांबळे हा या महिलेला त्रास देत होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा वारंवार फिर्यादीचा पाठलाग करुन त्यांना नोकरी लावतो, असे सांगून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असे. त्या बाहेर जात असताना त्यांचा रस्ता अडवून तू कोठे चालली आहे. मी तुझ्यासोबत येऊ का असे विचारत. फिर्यादी यांनी नकार देऊन त्या पुढे निघून गेल्या तरी तो पाठलाग करुन तू मला खूप आवडतेस, आपण फिरायला जाऊ, असे बोलत असे. फिर्यादी या गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता गंज पेठेतील स्वामी समर्थ मठाजवळून (Swami Samarth Math Pune) जात असताना कैलास कांबळे यांनी त्यांचा रस्ता अडविला.

त्यांना तो मी तुझ्याबरोबर येऊ का़ तु मला खूप आवडतेस असे बोलू लागला. तेव्हा फिर्यादीने आई व भावाला फोन लावते, असे सांगितले.
त्यावेळी आरोपीने तु फोन लावून तर बघ. तुला एकतर्फी प्रेमातून मारुन टाकतो व दोघाचे फोटो व्हायरल करतो, अशी धमकी दिली.
या प्रकाराने घाबरुन फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेतली (Pune Crime).
पोलिसांनी कैलास कांबळे याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक म्हस्के तपास करीत आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : Pune Crime | One-sided love threatens to kill a woman in Ganj Peth of pune khadak police arrest one!

 

हे देखील वाचा :

Nutan Marathi Vidyalaya (NMV Pune) | शिवजयंती निमीत्त नू. म. वी शाळेतील 200 विद्यार्थ्यांना भगवा फेटा घालून आनंद साजरा

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 700 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Corporator Pramod Bhangire | अनेक वर्षांपासूनच्या लढ्याला अखेर यश ! हांडेवाडी, काळेपडळ परिसरात 24 तास पिण्याचे पाणी उपलब्ध होणार

Pune Corporation | शेवटच्या टप्प्यात महापालिकेतील सभा, बैठकांच्या कामकाजांत नियमांना ‘छेद’ ! नाव समितीमध्ये वादावादी तर सर्वसाधारण सभाही रेटून नेली

 

Related Posts