IMPIMP

Pune Crime | पुण्यात ‘भाई’ची थेट पोलिसालाच धमकी ! ‘मी रामनगरचा ‘भाई’, तलवारीने फडशा पाडीन

by nagesh
Pune Crime | Incidents in Kondhwa An acquaintance on Instagram called the woman for a night visit and her husband beat her

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | तलवार (Sward) नाचवत परिसरात दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारावर (Criminal) कारवाई
करण्यासाठी गेलेल्या पोलिसाची कॉलर पकडून, त्यास तलवारीने फडशा पाडण्याची धमकी (Threat) दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune
Crime) घडला आहे. हा प्रकार पुण्यातील वारजे (Warje) परिसरातील रामनगरमध्ये (Ramnagar) घडला आहे. एवढेच नाही तर मी रामनगरचा भाई
असून, पोलिसांना घाबरत नाही असे म्हणून गुन्हेगाराने थेट पोलिसांनाच आव्हान दिले. याप्रकरणी पोलिसांनी ‘भाई’ला बेड्या ठोकल्या आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

धनंजय बबन बोराणे Dhananjay Baban Borane (वय – 34 रा. म्हसोबा टेकडी, रामनगर) याला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस कर्मचारी महेश बोयने (Mahesh Boyne) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विविध गुन्हे दाखल करुन आरोपीला अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धनंजय बोराणे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार (Pune Criminals) आहे.
गुरुवारी (दि.3) रात्री बाराच्या सुमारास तो हातात तलवार घेऊन रामनगर येथील म्हसोबा टेकडी येथे दहशत निर्माण करत असल्याचे पोलीस कर्मचारी महेश बोयने यांना दिसले.
महेश बोयने हे आरोपीला पकडण्यासाठी गेले असता त्याने त्यांची कॉलर पकडली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

‘मी पोलिसांना घाबरत नाही. मी रामनगरचा भाई आहे. तु जर मला पकडले तर याच तलवारीने मी तुझा फडशा पाडीन’ अशी धमकी आरोपीने महेश बोयने यांना दिली.
तसेच धक्का मारुन खाली पाडून पळून जाऊ लागला.
यावेळी त्याठिकाणी हजर असलेल्या इतर पोलिसांनी बोराणे याचा पाठलाग करुन पकडले.
पोलिसांनी पकडल्यानंतर देखील आरोपी शिवीगाळ करत होता.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पार्वे (PSI Parve) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | pune criminals threatens police constable with sward in warje malwadi area police arrest Dhananjay Baban Borane

 

हे देखील वाचा :

Pune Panshet Flood | ‘पानशेत पूरग्रस्त वसाहतींचे भूखंड मालकी हक्काने करण्यासाठी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पूरग्रस्त सोसायटीला सर्वतोपरी सहकार्य करेल’ – प्रशांत जगताप

Disha Salian Death Case | दिशा सालियन प्रकरण ! राणे पिता-पुत्रांना मोठा दिलासा !

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 120 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts