IMPIMP

Pune Panshet Flood | ‘पानशेत पूरग्रस्त वसाहतींचे भूखंड मालकी हक्काने करण्यासाठी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पूरग्रस्त सोसायटीला सर्वतोपरी सहकार्य करेल’ – प्रशांत जगताप

by nagesh
Pune Panshet Flood | City NCP will co-operate with the flood-hit society to reclaim the plots of flood-affected settlements NCP Pune City President Prashant Jagtap

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Panshet Flood | पानशेत पूरग्रस्त वसाहतींसाठी देण्यात आलेले भूखंड संबधित सोसायट्यांना मालकी हक्काने देण्यासाठी ६० रुपये प्रति चौ.मी. शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सहकारनगर, पदमावती, दत्तवाडी, गोखलेनगर, जनवाडी येथे प्रामुख्याने पानशेत पूरग्रस्त वसाहती (Pune Panshet Flood) असून त्यांना जागा मालकीहक्काने करण्यासाठी बँका अथवा पतपेढ्यातून कर्ज काढावे लागल्यास शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्‍वासन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (Pune NCP) शहरअध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी दिले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शहरातील पानशेत पूरग्रस्त वसाहतींतील घरे पूरग्रस्तांना मालकीहक्काने देण्याबाबत २०१३ मध्ये राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. परंतू ९९ वर्षांच्या लीजने दिलेली ही घरे ज्या भूखंडांवर आहेत, तो भूखंड शासनाने तेथील नागरिकांनी स्थापन केलेल्या सोसायट्यांना दिलेला आहे. शहरात पूरग्रस्तांच्या १०३ सोसायट्या आहेत. परंतू तांत्रिक अडचणींमुळे भूखंड मालकी हक्काने करून देताना शुल्क आकारणीत संदीग्धता निर्माण झाल्याने घरे मालकी हक्काने करण्याची प्रक्रिया विहीत वेळेत पुर्ण करणे पूरग्रस्त सोसायट्यांना शक्य झाले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दर निश्‍चित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काल मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये प्रति. चौ.मी. ६० रुपये दर आकारून पुढील तीन वर्षांमध्ये सोसायट्यांनी भुखंड मालकीहक्काने करण्याची प्रक्रिया पुर्ण करावी असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या सोसायट्यांतील एक हजारांहून अधिक नागरिकांचा घरे मालकी हक्काने होण्याचा दिर्घकाळ प्रलंबित राहीलेला प्रश्‍न मार्गी लागणार आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष प्रशांत जगताप (NCP Pune City President Prashant Jagtap) यांनी सांगितले. (Pune Panshet Flood)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पूरग्रस्त वसाहतींच्या निर्मितीनंतर जवळपास चार पिढ्या हा प्रश्‍न प्रलंबित राहील्याने अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
या सर्व सोसायट्यांची मिळून समिती तयार करण्यात आली आहे.
या समितीने यासाठी पाठपुरावा करून नागरिकांकडून कागदपत्रही गोळा करण्याचे काम सुरू केले आहे.
सोसायट्यातील भूखंडावर सदनिकांसाठी जागा मिळालेल्या पूरग्रस्तांकडून पैसे गोळा करून शासनाकडे पैसे भरावे लागणार आहेत.
सुदैवाने भूखंडांचा दर हा १९७६ मधील जमीनींचा दर असल्याने सर्व सोसायट्यांसाठी मिळून जेमतेम पाच ते सहा कोटी रुपये भरावे लागणार आहेत.
ही रक्कम गोळा करण्यासाठी अडचण येत असल्यास सोसायट्यांना पुणे जिल्हा सहकारी बँकेसह
अन्य बँका अथवा वित्तीय संस्थांमधून कर्ज उभारण्यासाठीही आवश्यक ती सर्व मदत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्यावतीने करण्यात येईल,
असे आश्‍वासनही जगताप यांनी यावेळी दिले. याप्रसंगी नगरसेविका अश्‍विनी कदम (Corporator Ashwini Kadam),
सुभाष जगताप (Corporator Subhas Jagtap), पानशेत सहकारी गृहरचना विकास मंडळाचे शशीकांत बडदरे (Shashikant Baddare) हे याप्रसंगी उपस्थित होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Panshet Flood | City NCP will co-operate with the flood-hit society to reclaim the plots of flood-affected settlements NCP Pune City President Prashant Jagtap

 

हे देखील वाचा :

Disha Salian Death Case | दिशा सालियन प्रकरण ! राणे पिता-पुत्रांना मोठा दिलासा !

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 120 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Bombay High Court | भाजप आमदार गिरीश महाजन यांना 10 लाख रुपये जमा करण्याचे हायकोर्टाचे निर्देश, काय आहे प्रकरण, जाणून घ्या

 

Related Posts