IMPIMP

Pune Crime | 3 लाखाचे 17 लाख केले वसुल ! घराचा ताबा देण्यासाठी महिलेकडे तगादा लावणाऱ्या 2 खासगी सावकारांच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

by nagesh
Pune Crime | Two arrested in Ashti for Painter Murder Case Manjri Pune Police Crime News

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुणे पोलिसांनी (Pune Police) खासगी सावकारांविरुद्ध (Private Lender) कारवाईचा बडगा उगारला असून प्रति महिना 40 टक्के व्याजाने (40% Interest On Money) पैसे देऊन पैशांसाठी तगादा लावणाऱ्या दोन खासगी सावकारांना (Money Lenders In Pune) गुन्हे शाखा युनिट सहाच्या (Pune Police Crime Branch) पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. शरीफ जमादार (Sharif Jamadar) व अरशान मनियार (Arshan Maniar) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी तक्रारदार महिलेच्या पतीकडून 3 लाखाचे 17 लाख रुपये व्याज वसुल केले (Pune Crime) आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत एका महिलेने गुन्हे शाखा युनिट 6 कडे तक्रारी अर्ज दिला होता. पोलिसांनी दोन खासगी सावकार यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) IPC 452, 500, 504, 506, महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम (Maharashtra Lenders Act) 2014 चे कलम 39,45 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. (Pune Crime)

 

तक्रारदार महिलेच्या पतीचा शेळ्या व बकऱ्यांचा व्यवसाय असून त्यांनी जमादार आणि मनियार याच्याकडून 3 लाख रुपये कर्ज घेतले होते. आरोपींनी 40 टक्के प्रति महिना दराने तक्रारदार महिलेच्या पतीला पैसे दिले होते. याबदल्यात त्यांच्या पतीने वर्षभरात 17 लाख रुपये दिले होते. कर्ज देताना आरोपींनी तक्रारदार महिलेच्या पतीकडून पैसे हातउसने घेतल्याबाबत नोटराईज अ‍ॅग्रीमेंट (Notarized Agreement) करुन कर्ज तारण म्हणून राहते घर लिहून घेतले होते.

 

दरम्यान, शरीफ आणि अरशान यांनी तक्रारदार महिलेच्या पतीकडे व्याजाची रक्कम देण्यासाठी तगादा लावला होता. खासगी सावकारांच्या त्रासाला वैतागून महिलेचे पती घर सोडून निघून गेले. त्यामुळे आरोपींनी व्याजाच्या (Interest) पैशासाठी महिलेकडे तगादा लावला. तसेच पैसे दिले नाहीतर घर खाली करुन घराचा ताबा देण्यासाठी शिवीगाळ करुन धमकी (Threat) दिल्याचे तक्रारीत म्हटले होते. पोलिसांनी तक्रारी अर्जाचा तपास करुन दोन खासगी सावकारांना अटक केली. पुढील तपास गुन्हे शाखा युनिट 6 करीत आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने (Police Inspector Ganesh Mane), सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील (API Narendra Patil), पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन शिंदे, ऋषीकेश टिळेकर, शेखर काटे, प्रतिक लाहिगुडे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Two Money Lenders Loni Kalbhor

 

हे देखील वाचा :

30 Plus Skin Care | वाढत्या वयातही तुम्हाला नवीन आणि सुंदर दिसायचं असेल तर फॉलो करा ‘या’ टिप्स; जाणून घ्या

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मुख्यमंत्र्यांचा समाचार; म्हणाले..

Chemplast Sanmar Stock | ‘हा’ न्यू लिस्टेड स्टॉक रू. 800 वर जाईल, एक्सपर्टने दिले बाय रेटिंग; आता डाव लावल्यास 55% होईल नफा

 

Related Posts