IMPIMP

Pune Crime | गुन्हे शाखेचा येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा, गांजाची तस्करी करणाऱ्या मध्य प्रदेशातील दोघांना अटक

by nagesh
Pune Crime News | Tanzanian national arrested by crime branch for drug trafficking again on bail; 7 lakh worth of cocaine seized

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | गांजाची तस्करी करणाऱ्या मध्य प्रदेशातील दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक दोनने छापा टाकून अटक केली आहे. आरोपींकडून पुण्यात विक्रीसाठी आणलेला 2 लाख 10 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई (Pune Crime) बुधवारी (दि.23) येरवडा परिसरातील ख्रिश्चन स्मशानभूमी समोर करण्यात आली.

 

अजय मुक्तीलाल पवार (वय 28), अरविन सुखलाल सोलंकी (वय 28, दोघे मूळ रा. बडवानी, मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची (Pune Crime) नावे आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथक येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते. मध्य प्रदेशातील दोन जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी ख्रिश्चन स्मशानभूमी जवळ सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये गांजा आढळून आला. आरोपींकडून 10 किलो 310 ग्रॅम वजनचा गांजा, मोबाइल, असा एकूण 2 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णीक,
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण,
पोलीस अंमलदार संतोष देशपांडे, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, संदीप जाधव, रवींद्र रोकडे,
साहिल शेख, दिशा खेवलकर, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, आझीम शेख, दिनेश बास्टेवाड यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | pune police Crime Branch raids in Yerwada police station limits, arrests two from Madhya Pradesh for smuggling ganja

 

हे देखील वाचा :

Election Commission of India | ‘आम्ही निवडणूक आयोगात योग्य लोकांचीच निवड करतो’ – केंद्र सरकार

Uddhav Thackeray – BMC Elections | मनपा निवडणूक जिंकण्यासाठी ठाकरेंचा शिवसैनिकांना कानमंत्र, म्हणाले – ‘जिंकण्यासाठी मैदानात उतरूया, बीएमसी आपल्याकडेच राहणार’

Pune Crime | लव्ह मॅरेज झाले असताना दुसरीवर जडला जीव, प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पत्नीसोबत केलं भयानक कांड; पुणे जिल्ह्यातील घटना

 

Related Posts