IMPIMP

Pune Crime | पुण्यातील शाम सोनटक्के खून प्रकरणातील आरोपी सॅन्डी उर्फ संदीप चव्हाणला जामीन मंजूर

by nagesh
Pune Crime | Bail granted to the accused who suffocated the tempo driver for not waiting for the car

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुण्यातील (Pune Crime) सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या (Sinhagad Road Police Station) हद्दीत शाम हिराचंद्र सोनटक्के (Sham Hirachandra Sontakke) याचा निर्घृण खून (Murder in Pune) करण्यात आला होता. खूनाच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) असलेला आरोपी सॅन्डी उर्फ संदीप नरसिंह चव्हाण (Sandy alias Sandeep Narasimha Chavan) याचा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक (Additional Sessions Judge Sunil Vedpathak) यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर (Bail Granted) केला असल्याची माहिती आरोपीचे वकील अ‍ॅड. सुधीर तानाजीराव पाटील (Adv. Sudhir Tanajirao Patil) यांनी दिली.(Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शाम सोनटक्के याचा 5 मे 2021 रोजी निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपी संदीप चव्हाण याच्यासह 16 आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी संदीप चव्हाण याने अ‍ॅड. पाटील यांच्यामार्फत अतिरिक्त सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी झाली. अ‍ॅड. पाटील आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला.(Pune Crime)

 

 

अ‍ॅड. सुधीर पाटील यांनी सत्र न्यायालयापुढे युक्तिवाद केला की, आरोपीच्या विरोधात कोणताही सबळ पुरावा (Evidence) नाही. तपास यंत्रणांनी गोळा केलेल्या पुरव्यांची साखळी ही सकृतदर्शनी आरोपींनी गुन्हा केला आहे, असे सिद्ध होत नाही. त्याचबरोबर शाम सोनटक्के याचा मृत्यु दुर्देवी होता, परंतु आरोपी व शाम सोनटक्के यामध्ये कुठलेही वैमनस्य नव्हते. तसेच त्याला मारण्याचा कुठलाही हेतू आरोपीकडे नव्हता. जिल्हा सरकारी वकील पाटील यांनी कोर्टापुढे युक्तिवाद केला की, आरोपीने केलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून त्याचे विरुद्ध सबळ पुरावा आहे. तसेच अशा गंभीर स्वरुपाच्या गुन्हयात आरोपींना जामिन दिल्यास ते सरकारी साक्षीदारांवर दबाव (Pressure on Witnesses) आणतील. त्यामुळे त्यांचा जामीन नामंजूर करण्यात यावा.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

यावर अ‍ॅड. सुधीर पाटील म्हणाले की, संपुर्ण खटल्यातील कोणताच प्रत्यक्षदर्शनी साक्षीदार हा आरोपीच्या भूमिकेचे वर्णन करीत नाही. त्याचप्रमाणे फिर्यादीचा पुरवणी जबाब हा प्रत्यक्ष गुन्हा घडल्यानंतर दोन दिवसांनी नोंदवला आहे. त्यामुळे पुरवणी जबाबाला जामिन देताना योग्य वजन देता येणार नाही, हे विविध उच्च न्यायालयाचे (High Court) न्यायनिवाडे सादर करुन करुन अ‍ॅड. सुधीर पाटील यांनी आपले म्हणणे न्यायालयापुढे मांडले.

 

 

तसेच कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की, तपास यंत्रणेने
केलेल्या तपासात पुराव्याच्या साखळी ही सिद्ध होत नाही.
त्यामुळे अशा परिस्थितीत आरोपी संदीप चव्हाण याने
कटकारस्थान करुन खून केल्याप्रकरणी त्याला जामिन
नाकारता येणार नाही. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनील
वेदपाठक यांच्या न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरुन
आरोपी संदीप नरसिंग चव्हाण याची जामिनावर मुक्तता केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Sandy alias Sandeep Chavan, accused in Sham Sontakke murder case in Pune, granted bail

 

हे देखील वाचा :

Beed Crime | भाजप जिल्हाध्यक्षाच्या शेतातील पत्त्याच्या क्लबवर पोलिसांची छापोमारी; 75 लाखांचा मुद्देमाल जप्त, राजेंद्र म्हस्केंसह 50 जणांविरुद्ध FIR

Narayan Rane | नारायण राणे यांना ‘या’ विधानावरुन पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस

Pune Crime | पुण्यातील तडीपार आरोपीची पोलिसांना बघून घेण्याची धमकी

 

Related Posts