IMPIMP

Pune Crime | धक्कादायक ! पिंपरीत DTDC कुरिअरने मागवल्या 97 तलवारी, 2 कुकरी, 9 म्यान

by nagesh
Pune Crime | Shocking 97 swords 2 cookers 9 sheaths ordered by DTDC courier In Pimpri

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | औरंगाबाद येथे डी. टी. डी. सी कुरिअर कंपनी मध्ये (DTDC Courier Company Aurangabad) अवैधपणे तलवारीचा साठा (Sword Stock) आढळून आल्यानंतर पुणे पोलीस (Pune Police) अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. औरंगाबादच्या पार्श्वभूमीवर दिघी पोलीस ठाण्याचे (Dighi Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे (Senior Police Inspector Dilip Shinde) यांनी हद्दीतील कुरिअर कंपनीत जाऊन येणाऱ्या प्रत्येक पार्सलचे स्कॅनिंग (Parcel Scanning) करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार केलेल्या तपासणीत कुरिअरने मागवलेल्या 97 तलवारी, 2 कुकरी, 9 म्यान असा 3 लाख 22 हजार रुपयांची शस्त्रे पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

उमेश सुद Umesh Sud (रा. घर नं.40, ग्रीन अ‍ॅव्हेन्यु, अमृतसर – Amritsar, पंजाब – Punjab), अनिल होन Anil Hon (रा. औरंगाबाद), मनिंदर Maninder (रा. खालसा फोर्स शॉप, घंटा घर कॉम्पलेक्स, मार्केट दरबार साहेब, अमृतसर, पंजाब), आकाश पाटील Akash Patil (रा. मु. पो. चितली ता. राहता जि. नगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथे डीटीडीसी कुरिअर कंपनीमध्ये अवैधपणे तलवारीचा साठा आढळून आला होता. त्या अनुषंगाने सर्व कुरिअर कंपनीमध्ये येणाऱ्या पार्सलचे काळजीपूर्वक स्कॅनिंग करण्याबाबतच्या सूचना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (CP Krishna Prakash) यांनी दिल्या होत्या. त्यानुसार कुरिअर कंपन्या त्यांच्या गोडाऊनमधील माल एक्सरे मशीनमधून स्कॅन करीत होत्या.

 

डीटीडीसी कुरिअर कंपनीचे दिघी येथे मध्यवर्ती वितरण केंद्र असून, कंपनीचे दिघी येथे गोडाऊन आहे. आरोपी उमेश सुद याने अनिल होन याला 2 लाकडी बॉक्स डीटीडीसी कुरिअर कंपनीमध्ये पार्सल पाठवले होते. हे बॉक्स 1 एप्रिलला एक्सरे स्कॅनिंग मशिनद्वारे तपासणी केली असता बॉक्समध्ये तलवार सदृश वस्तू आढळून आली. त्यानुसार पोलिसांनी दोन लाकडी बॉक्समधील 92 तलवारी, 2 कुकरी, 9 म्यान असा एकूण 3 लाख 22 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आरोपी मनींदर याने आरोपी आकाश पाटील याला एका बारदानाच्या कपड्यामध्ये पार्सल पाठवले होते. डीटीडीसी कुरिअर कंपनीच्या दिघी येथील गोडाऊनमध्ये रविवारी (दि.3) बारदानाच्या कापडातील या पार्सलची एक्सरे स्कॅनिंग मशिनद्वारे तपासणी केली. त्यावेळी त्यामध्ये तलवार सदृश वस्तू आढळून आल्या. त्यानुसार पोलिसांनी 15 हजार रुपये किमतीच्या 5 तलवारी जप्त केल्या.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (IPS Krishna Prakash),
अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे (Addl CP Sanjay Shinde),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मंचक इप्पर (DCP Manchak Ipper),
सहायक पोलीस आयुक्त चाकण विभाग प्रेरणा कट्टे (APC Prerna Katte)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, पोलीस निरीक्षक गुन्हे प्रकाश जाधव (Police Inspector Prakash Jadhav),
पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर दळवी (PSI Dnyaneshwar Dalvi),
पोलीस उपनिरीक्षक भंडारे, पोलीस हवालदार अमोल जाधव, शेखर शिंदे, घुगरे, चालक पोलीस नाईक हेमंत डुंबरे यांच्या पथकाने केली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Shocking 97 swords 2 cookers 9 sheaths ordered by DTDC courier In Pimpri

 

हे देखील वाचा :

Benefits OF Honey And Nutmeg | जाणून घ्या मध आणि जायफळ एकत्र खाण्याचे अनेक फायदे

Rice Water Benefits For Skin | तांदळाच्या पाण्याचे त्वचेसाठी ‘हे’ 5 फायदे तुम्हाला आश्चर्यचकीत करतील!

Gold Silver Price Today | खुशखबर ! सोन्याच्या किमतीत घसरण तर, चांदीही उतरली; जाणून घ्या नवीन भाव

Sandeep Deshpande | ‘असे धमकी देणारे खूप गृहमंत्री आम्ही बघितले…’; मनसेच्या नेत्याचं थेट गृहमंत्र्यांना आव्हान

 

Related Posts