IMPIMP

Pune Crime | पुण्याच्या हडपसरमधील धक्कादायक घटना ! प्रेमसंबंधाबाबत पतीला सांगून बदनामी करण्याची धमकी; 30 वर्षीय विवाहितेकडे शरीरसुखाची मागणी

by nagesh
Beed Crime News | wifes immoral relationship with neighbors husband commits suicide in beed crime news beed police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | जबरदस्तीने घरात शिरुन विवाहितेला मारहाण करुन तू जर माझ्यावर प्रेम नाही केले तर आपल्या प्रेमसंबंधाबाबत तुझ्या नवर्‍याला व नातेवाईकांना सांगून तुझी बदनामी करेल, अशी धमकी देऊन तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करणार्‍या ‘मजनू’वर हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) विनयभंगाचा (molestation case) गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

यश अंकुश वाघमारे (रा. फुरसुंगी) असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे. याप्रकरणी फुरसुंगीतील एका ३० वर्षाच्या विवाहितेने हडपसर पोलीस
ठाण्यात फिर्याद (Pune Crime) दिली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या ४ नोव्हेंबरला सकाळी घरात असताना आरोपी जबरदस्तीने घरात शिरला. फिर्यादीशी लगट करु लागला. त्याला त्यांनी प्रतिकार केला असता त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. तू जर माझ्यावर प्रेम नाही केले तर आपल्या प्रेमसंबंधाबाबत तुझ्या नवर्‍याला व नातेवाईकाला सांगून तुझी बदनामी करेल, अशी धमकी दिली. त्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी फिर्यादी यांच्या घराजवळ येऊन फिर्यादीला तू मला आवडतेस माझ्यासोबत लॉजवर चल असे बोलून त्यांचा विनयभंग केला. फिर्यादी यांनी पती आणि भावाला हा सर्व प्रकार सांगून पोलिसांकडे तक्रार  केली आहे. पोलीस उपनिरीक्षक ढावरे तपास करीत आहेत.

 

Web Title: Pune Crime | Shocking incident in Hadapsar, Pune! Threatening to defame her husband by telling him about the love affair; Demand for physical comfort from a 30-year-old married woman

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात चोरट्यांनी मारला लेफ्टनंट कर्नलच्या घरातील दारुच्या बाटल्यांवर डल्ला

ST Workers Strike | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन

Cryptocurrency | क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या ‘ही’ अ‍ॅडव्हायजरी, ‘या’ गुप्तचर संस्थेने जारी केला फ्रॉडचा इशारा

 

Related Posts