IMPIMP

ST Workers Strike | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन

by nagesh
ST Workers Strike | bjp mla gopichand padalkar sadabhau khot st workers strike shivsena minister abdul sattar

सरकारसत्ता ऑनलाइन  – ST Workers Strike | एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर (Mumbai High Court) देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा (ST Workers Strike) काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन केले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे. (ST Workers Strike)

राजकीय पक्षांनी देखील गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका अशी माझी त्यांनाही कळकळीची विनंती आहे. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या.

 

Web Title: ST Workers Strike | Chief Minister Uddhav Thackeray’s appeal to ST employees

 

हे देखील वाचा :

Cryptocurrency | क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या ‘ही’ अ‍ॅडव्हायजरी, ‘या’ गुप्तचर संस्थेने जारी केला फ्रॉडचा इशारा

Maharashtra Corona Vaccination | महाराष्ट्राने केला व्हॅक्सीनेशनचे 10 कोटी डोस देण्याचा विक्रम; राजेश टोपे आरोग्य कर्मचार्‍यांना म्हणाले – ‘शाब्बास’ !

Nilofer Malik | अमृता फडणवीसांच्या ‘बिगडे नवाब’ ट्विटला नवाब मलिकांची मुलगी निलोफरनं दिलं उत्तर, म्हणाल्या…

Pune Crime | वाळू व्यावसायिक संतोष जगतापच्या बॉडीगार्डचा उपचारादरम्यान मृत्यू

Nawab Malik | देवेंद्र फडणवीसांनी राजकारणाचे गुन्हेगारीकरण केल्याचा नवाब मलिकांचा आरोप; म्हणाले – ‘देवेंद्रजी, दाऊद गँगचा रियाझ भाटी तुमच्या डिनर टेबलवर कसा दिसायचा’

 

Related Posts