IMPIMP

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार ! स्वच्छतागृहात जायच्या आधी महिलांना लिहावा लागायचा अर्ज; ‘या’ कंपनीतील प्रकाराचा ‘मनसे’कडून ‘पर्दाफाश’

by nagesh
pune-crime-shocking-women-staff-has-to-write-application-before-using-toilet-in-a-pune-company-paud-police-station-area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुण्यातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस (Pune Crime) आला आहे. पिरंगुट (Pirangut) येथील एका कंपनीत महिलांना अपमानजनक वागणूक दिली जात असल्याचं समोर आलंय. एका कंपनीत महिलांना मानसिक त्रास दिला जात होता. धक्कादायक बाब म्हणजे स्वच्छतागृहात जाण्यापुर्वी त्यांच्याकडून अर्ज लिहून घेतला जात होता. तसेच, महिलांना कार्यालयात यायला उशीर झाला तर बाहेर गेटवर थांबवले जात होते. हा धक्कादायक प्रकार मनसेनं (MNS) उघडकीस आणला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पिरंगुट येथील एका कंपनीत महिलांना अपमानजनक वागणूक दिली जात होती. तसेच महिलांना मानसिक त्रास दिला जात होता. हा सर्व धक्कादायक प्रकार मनसेचे (MNS) माथाडी कामगार नेते निलेश माझीरे (Nilesh Mazhire) यांना समजताच ते थेट कंपनीत दाखल झाले. तसेच, तेथील महिलांनी माझीरे यांच्यापुढे तक्रारी दिल्या. त्यानंतर मनसेने कंपनीच्या मॅनेजरला जाब विचारला त्यावेळी त्या मॅनेजरने देखील या प्रकाराची कबुली दिली आहे. (Pune Crime)

 

दरम्यान, ‘कंपनीतील एका महिलेने कळवले की, 5 महिलांना अचानक काढून टाकण्यात आलंय.
त्या महिलेने दिलेल्या माहितीनंतर आम्ही ती कंपनी गाठली असता तिथल्या अनेक गोष्टी आमच्यासमोर आल्या आहेत.
महिलांनी गैरप्रकाराची तक्रार करायला सुरुवात केली. या सर्व प्रकारामुळे महिलांचा आत्मसन्मान दुखावला गेला आहे.
असं निलेश माझीरे (Nilesh Mazhire) यांनी सांगितलं. त्याचबरोबर कंपनीतील पीडित महिला
या प्रकरणाची तक्रार पौड पोलीस ठाण्यात (Paud Police Station) करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

 

हे देखील वाचा :

Liver detox foods | लिव्हर आतून स्वच्छ करून मजबूत करतील ‘या’ गोष्टी, अनेक आजार राहतील दूर; जाणून घ्या

Yamini Malhotra | ‘गुम हे किसीके प्यार मे’मधल्या ‘या’ अभिनेत्रीनं केलं टॉवेलवर फोटोशूट, फोटो व्हायरल

Supreme Court | ‘कोणतेही डॉक्टर आपल्या रूग्णाला जीवनाची खात्री देऊ शकत नाहीत’ – सर्वोच्च न्यायालय

 

Related Posts