IMPIMP

Pune Crime | नातवाला ओरडल्याने सुनेचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न; हडपसरमधील घटनेत पती, सासू, दीर, जाऊवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | The sister's son tried to rape the woman and the girl by abducting her in anger

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | सासर्‍याने पैसे देणे बंद केल्यावर सुनेला क्रूर वागणूक देणे सुरु झाले. मस्ती करणार्‍या आपल्या मुलाला ओरडल्याच्या कारणावरुन पती, सासु, दीर, जाऊने तिला मारहाण केली. सासुने गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police) पती कुणाल शांताराम कचरावत, सासु लंका कचरावत, दीर रामु कचरावत आणि जाऊ पार्वती कचरावत (सर्व रा. सातवनगर, हांडेवाडी रोड, हडपसर) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रुबी कुणाल कचरावत (वय २७) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा कुणाल यांच्याबरोबर विवाह झाल्यानंतर गेल्या १० वर्षांपासून त्यांचा मानसिक व शारीरीक छळ केला जात आहे.
फिर्यादी यांच्या वडिलांकडून वेळोवेळी १ लाख रुपये घेतले.
वडिलांनी पैसे देणे बंद केल्यानंतर फिर्यादीला क्रूर वागणूक देणे सुरु केले.
फिर्यादीच्या छोट्या मुलाने २७ जानेवारी २०२२ रोजी मस्ती केल्याने त्या मुलाला ओरडल्या.
या कारणावरुन फिर्यादीचा पती कुणाल कचरावत याने फिर्यादी यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली.
बेडरुममध्ये ओढून नेले.
नंतर फिर्यादी यांनी सुटका करुन घेऊन खाली जात असताना सासुने फिर्यादीचे केसाला पकडून पांढर्‍या पायाची पाल आहेस.
तु मरुन जा नाही तर तुला सोडणार नाही, असे म्हणून फिर्यादीला मारुन टाकण्यासाठी सुरी घेऊन अंगावर धावून आल्या. (Pune Crime) फिर्यादी या पळून जात असताना दीर रामू व जाऊ पार्वती यांनी तिला पकडले. तेव्हा सासु हिने फिर्यादीचा गळा दाबल्याने त्या बेशुद्ध पडल्या. तेव्हा त्या मेल्या असल्याचे समजून त्यांना बेडरुमध्ये आणून टाकले. त्यानंतर त्यांनी बुधवारी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Shouting at the grandson and trying to kill him by strangling the gold In Hadapsar case attempted murder of husband mother in law brother in law and daughter in law was registered

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1084 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Rajinikanth | मुलीच्या घटस्फोटामागोमाग सुपरस्टार रजनीकांत यांना आणखी एक धक्का

Deccan Queen Express | रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ! मुंबईत 72 तासांचा ब्लॉक; 4 दिवस डेक्कन क्वीन रद्द

Asaduddin Owaisi | ‘मेरठ येथून परत येताना गाडीवर गोळीबार, 4 राऊंड केले फायर’ – असदुद्दीन ओवेसींचा दावा

 

Related Posts