IMPIMP

Pune Crime | राज्य उत्पादन शुल्क विभागाची पिंपरी चिंचवडमध्ये मोठी कारवाई ! बनावट स्कॉच व व्हिस्की जप्त; 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

by nagesh
Pune Crime | State Excise Department’s big action in Pimpri Chinchwad! Counterfeit scotch and whiskey seized; 7 lakh confiscated

पुणे / पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) नुकतीच पुण्यातील (Pune Crime) वारजे माळवाडी येथे मोठी कारवाई करुन 52 लाखांचा मद्यसाठा जप्त केला होता. त्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये (pimpri Chinchwad) बनावट स्कॉच (scotch) व व्हिस्की (whiskey) विक्रीचा पर्दाफाश केला आहे. पिंपरी चिंचवड मधील पिंपळे सौदागर येथे केलेल्या कारवाईत 6 लाख 71 हजार 895 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन एकाला अटक (Arrest) केली आहे. दिवाळी आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमुळे बनावट दारू विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील झिंजुर्डे चाळीतील पत्र्याच्या खोलीत कमी प्रतीचे मद्य उच्च प्रतिच्या रिकाम्या स्कॉचच्या बाटलीत
भरून त्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार छापा टाकला असता कांजी शामजी पटेल (Kanji Shamji Patel) हा उच्च प्रतीच्या स्कॉचच्या रिकाम्या बाटलीमध्ये कमी प्रतीचे विदेशी मद्य भरताना आढळून आला.
खोलीची झडती घेतली असता खोलीमधून विविध कंपन्यांच्या उच्च प्रतिच्या स्कॉचच्या 65 सिलबंद आणि 724
रिकाम्या बाटल्या, बुचे, लेबल असा मुद्देमाल जप्त (Pune Crime) करण्यात आला आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप (state excise commissioner kantilal umap), विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे (Divisional Deputy Commissioner Prasad Surve),
पुण्याचे अधीक्षक संतोष झगडे (Pune Superintendent Santosh Jhagde),
उप अधीक्षक एस.आर जाधव (Deputy Superintendent S.R. Jadhav) यांच्या मार्गदर्शनाखाली
राज्य उत्पादन शुल्क (ई विभागातील) निरीक्षक एस.एम. परळे, पी.एस. सेतसंदी, एन.आर. मुंजाळ,
दुय्यम निरीक्षक व कर्मचारी एस.वाय. दरेकर, डी.बी गवारी, एन.यु. जाधव, ए.आर. दळवी, एन.एस पिंगळे, समीर बिरांजे राजू पोटे यांच्या पथकाने केली.

 

Web Title:  Pune Crime | State Excise Department’s big action in Pimpri Chinchwad! Counterfeit scotch and whiskey seized; 7 lakh confiscated

 

हे देखील वाचा :

Benefits of Mor Pankh | ‘मोरपंख’ प्रत्येक संकटावर रामबाण उपाय, जाणून घ्या याच्याशी संबंधीत 7 उपाय आणि सविस्तर माहिती

Pune Crime | पुणे शहरातील दोन अट्टल गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये CPअमिताभ गुप्तांची आतापर्यंत 46 जणांवर कारवाई

Nilesh Rane | ‘टाईमपास होत नसेल तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बिग बॉसमध्ये जावं’ – निलेश राणे

 

Related Posts