IMPIMP

Pune Crime | पुणे शहरातील दोन अट्टल गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये CPअमिताभ गुप्तांची आतापर्यंत 46 जणांवर कारवाई

by nagesh
Pune Cyber Crime | Fake loan app call center busted by Pune Cyber police; 18 accused arrested, confidential data of one lakh people in hands of police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  पुणे शहरातील (Pune Crime) हडपसर आणि सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यानुसार (MPDA Act) एक वर्षासाठी स्थानबद्धतेची (Pune Crime) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल 46 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) कंबर कसली आहे. त्यानुसार गुन्हेगारांवर मोक्का (MCOCA Action) Mokka, तडीपार आणि स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीतील अजहरुद्दीन उर्फ हजरुद्दीन उर्फ अज्जु मेहबुब शेख (वय-29 रा. नवीन म्हाडा कॉलनी, हिंगणे मळा, हडपसर)
आणि सहकारनगर पोलीस ठाण्याच्या (Sahakarnagar police station) हद्दीतील सराईत गुन्हेगार राजू राम उर्फ जटाळ्या उमाप (वय-25 रा.आण्णाभाऊ साठे वसाहत, अरण्येश्वर)
अशी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांची (criminal) नावे आहेत.

 

अज्जु शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह हडपसर, वानवडी (Wanwadi Police Station) परिसरात कोयता,
लाकडी बांबू यासारख्या हत्यारांसह फिरत असताना खुन, जबरी चोरी, दुखापत, दंगा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गुन्हे (Pune Crime) केले आहेत.
मागील पाच वर्षात त्याच्यावर 8 गंभीर गुन्हे हडपसर पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे (Senior Police Inspector Arvind Gokule) व बाळकृष्ण कदम (Balkrishna Kadam)
यांनी आरोपी अज्जु शेख याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांना सादर केला होता.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार राजू राम उर्फ जटाळ्या उमाप याने त्याच्या साथिदारांसह सहकारनगर,
भारती विद्यापीठ (bharati vidyapeeth police station), दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या (Dattawadi Police Station) हद्दीत गुन्हे केले आहेत.
आरोपी उमाप गावठी कट्टा, हॉकी स्टीक, लोखंडी कोयता, पालघन, रॉड यासारख्या हत्यारांसह परिसरात फिरत असताना त्याने साथीचा रोग कायद्याचे उल्लंघन,
खुनाचा प्रयत्न, दुखापत, जाळपोळ, जबरी चोरी, विनापरवाना पिस्टल बाळगणे, सरकारी नोकरांवर हल्ला करणे या सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
मागील पाच वर्षात त्याच्यावर 8 गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई (Senior Police Inspector Swati Desai) यांनी उमाप याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांना दिला होता.

 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन दोन्ही गुन्हेगारांवर एमपीडीए अ‍ॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले.
पोलीस आयुक्तांनी मागील एक वर्षात 46 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई (Pune Crime) केली आहे.
यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

Web Title : Pune Crime | Two hardened criminals from Pune city are lodged for one year! CP Amitabh Gupta’s action against 46 people so far under MPDA Act

 

हे देखील वाचा :

Nilesh Rane | ‘टाईमपास होत नसेल तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बिग बॉसमध्ये जावं’ – निलेश राणे

Multibagger Stock | 240 रुपयांच्या ‘या’ शेयरने गुंतवणुकदार झाले मालामाल, वर्षभरात झाला मोठा नफा; 1,091 वर जाऊ शकतो शेयरचा भाव

New Rules For Packed Goods | 1 एप्रिल 2022 पासून पॅक केलेल्या मालासंदर्भात आता नवीन नियम; जाणून घ्या

 

Related Posts