IMPIMP

Pune Crime | विनापरवानगी बाजीराव पेशवेंची मिरवणूक ! ब्राम्हण महासंघाच्या अध्यक्षांसह 25 जणांविरूध्द गुन्हा

by nagesh
Pune Crime | Bajirao Peshwa’s procession without permission! Crime against 5 persons including the president of Brahmin Federation

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | श्रीमंत बाजीराव पेशवे (shrimant bajirao peshwa) यांच्या ३२१ व्या जयंती निमित्त घाडा व वाजंत्रीसह मिरवणुक काढणार्‍या ब्राम्हण महासंघाच्या अध्यक्षांसह पदाधिकार्‍यांवर विश्रामबाग पोलिसांनी (vishrambag police) गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

अध्यक्ष आनंद दवे, मनोज तारे, श्रीपाद कुलकर्णी, मयुरेश घाणेकर, विनोद जोशी, मदन सिन्नरकर व इतर २० ते २५ स्त्रीपुरुषांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार गणेश तुर्के यांनी विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली आहे.

श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या ३२१ व्या जयंतीनिमित्त बुधवारी लाल महाल चौक ते शनिवारीवाडा दरम्यान वाजंत्री, घोडा यांच्यासह मिरवणुक काढण्यात आली होती. शनिवारवाडा येथील कार्यक्रमात महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून शहरात मिरवणुक, पदयात्रा काढून ५ किंवा ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असताना कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याची कोणतीही खबरदारी न घेता लोकांचे जीवीतास धोका निर्माण होईल, असे कृत्य केल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title : Pune Crime | Bajirao Peshwa’s procession without permission! Crime against 5 persons including the president of Brahmin Federation

 

हे देखील वाचा :

Burglary in Pune | फिरायला गेलेल्या कुटुंबाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला, 90 लाखांचा ऐवज लंपास

Pune News | टास्क फोर्स तज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच शाळांबाबतचा निर्णय घेतला जाईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

OBC Lists | आता राज्यांना मिळाला OBC यादी बनवण्याचा अधिकार, राष्ट्रपती कोविंद यांनी दिली मंजूरी; आता विधेयक बनले कायदा

MP Amol Kolhe | दोन्ही डोस घेतल्यानंतरही खा. डॉ.अमोल कोल्हे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

Samruddhi Mahamarg Accident | दुर्देवी ! समृध्दी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू; सिंदखेडराजा तालुक्यातील घटना

 

Related Posts